विशेष प्रतिनिधी
चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला पाकिस्तान परस्त पार्टी असे लेबल लावतात. पण हे लेबल किती योग्य आहे, हे काँग्रेसचे नेत्यांच्या वक्तव्यातूनच समोर आले. काँग्रेसचे उत्तर प्रदेश मधले लोकसभेचे उमेदवार ललितेश पती त्रिपाठी यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर अर्थात POK ही पाकिस्तानची भूमी आहे. ती भारताने घेण्याचा प्रयत्न केला, तर ते पाकिस्तानवरचे आक्रमण ठरेल, असे अकलेचे तारे तोडले होते. Controversial statement of former Chief Minister of Punjab
त्या पाठोपाठ पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते जालंदर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांनी त्यापुढे जाऊन वादग्रस्त विधान केले आहे. काँग्रेस प्रणित इंडी आघाडीची सत्ता केंद्रात आली, तर आम्ही भारत – पाकिस्तान सीमा कायमची खुली करू, असे चरणजीत सिंग चन्नी म्हणाले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे. ते देशातली विविध कंत्राटे मुस्लिमांना देण्याची जाहीर भाषा करतात, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीपासूनच केला होता. काँग्रेस नेते आणि पाकिस्तानी नेते यांच्या भाषेत समानता असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. त्या पाठोपाठ ललितेश पती त्रिपाठी आणि चरणजीत सिंग चन्नी यांची विधाने आली. काँग्रेस प्रणित इंडी आघाडीची सत्ता आली, तर भारत – पाकिस्तानची सीमा कायमची खुली करू. वाघा बॉर्डर खुली करून पाकिस्तानी नागरिकांना भारतात खुला प्रवेश देऊ. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना भारतात येऊन वैद्यकीय उपचार घेणे शक्य होईल. पंजाब मधला मेडिकल टुरिझम वाढेल, असे अकलेचे तारे चरणजीत सिंग चन्नी यांनी तोडले.
हे तेच चरणजीत सिंग चन्नी आहेत, ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यात मोदींच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी चरणजीत सिंग चन्नी यांच्या सरकारने पूर्ण अनास्था दाखवली होती. या चेन्नी यांना काँग्रेसने जालंधर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे आणि त्यांनी भारत पाकिस्तान सीमा कायमची खुली करण्याची ऑफर दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App