वृत्तसंस्था
हरिद्वार : कुस्तीगीर आंदोलनाचे काँग्रेसचे टूलकिट बाहेर आलेले आज दिसले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारे कुस्तीगीरांनी आपली ऑलिंपिक पदके गंगेत सोडून देण्यासाठी सोडून देण्याचे सकाळी जाहीर केले होते. केंद्र सरकारने जंतर-मंतर करून हटविल्यानंतर केंद्र सरकारचा निषेध आणि ब्रजभूषण सिंह यांचा निषेध यासाठी देशाला मिळालेली पदके गंगेत सोडून देण्याचा त्यांचा कावा होता. पण दरम्यानच्या काळात काँग्रेसची टूलकिट वर्क झाले. कुस्तीगीरांना मिळालेली ऑलिम्पिक पदके गंगेत सोडून दिली तर कुस्तीगीरांना मिळणारी सहानुभूती कमी होण्याचा धोका काँग्रेस नेत्यांना वाटला आणि त्यामुळे कुस्तीगीर महासंघाच्या राजकारणात ब्रजभूषण सिंह यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे नेते दिपेंद्र हुडा हे कुस्तीगीरांच्या संपर्कात राहिले आणि त्यांनी पदके गंगेत सोडून देण्यापासून त्यांना परावृत्त केले.Congressional Toolkit of Kustigir Movement; The program of abandoning the Olympic medals in the Ganges has failed!!
काँग्रेस नेते दीपेंद्र हुडा, आज दुपारी लखनौला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्ये फोनवर कुस्तीपटूंच्या निषेधाचे समन्वय साधताना ऐकले गेले तेही अगदी स्पष्टपणे.
कृषी आंदोलनाचे नेते नरेश टिकैत हे देखील हरिद्वारला पोहोचले. त्यांनी कुस्तीगीरांना गंगेत पदके सोडून देण्यापासून बाजूला केले. त्यांच्याकडे 5 दिवसांची मुदत मागितली. त्यानंतर कुस्तीगीर हरिद्वारातून निघून गेले. प्रत्यक्षात कुस्तीगीरांचे आंदोलन हे सर्व राजकीय आणि नियोजनबद्ध आहे. कुस्तीगीरांचा निषेध म्हणजे काँग्रेस टूलकिट आणि लक्ष्य हरियाणा आहे. कारण दिपेंद्र हुडा हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंडर सिंह हुडा यांचे चिरंजीव आहेत. त्यांना कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष व्हायचे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App