राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेतही झाल्या होत्या सहभागी. Himani Narwal
विशेष प्रतिनिधी
चंदीगढ : हरियाणाच्या रोहतकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. हिमानी यांचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला. ही घटना सांपला परिसरातील आहे. हिमानी या राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्या होत्या. Himani Narwal
त्या राहुल गांधींसोबतही दिसून आल्या होत्या. गेल्या वर्षी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्या खूप सक्रिय होत्या. त्यांनी निवडणुकीसाठी प्रचारही केला. भूपेंद्र सिंग हुड्डा आणि दीपेंद्र सिंग हुड्डा यांच्या निवडणूक प्रचारातही त्यांनी भाग घेतला होता. काँग्रेस आमदार भारत भूषण बत्रा यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहतकमधील सांपला उड्डाणपूलाजवळ एका सूटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रोहतकमधील विजय नगर येथील रहिवासी होती. महिलेचे वय सुमारे २२ वर्षे असल्याचे सांगितले गेले. काही रस्त्याने जाणाऱ्यांनी सुटकेस पाहिली आणि पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. सांपला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी केली जात आहे.
नंतर मृत महिलेची ओळख काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल अशी झाली. हिमानी सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या. त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही भाग घेतला होता. हरियाणा निवडणुकीत त्या अनेक काँग्रेस नेत्यांच्या प्रचारात सक्रिय होत्या. पण हिमानी नरवाल यांचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App