वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेच्या विश्रांती काळात काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पावलावर पाऊल नाही टाकले, तर त्यांच्या लिहित्या हातावर आपला हात टाकला आहे. Congress will win in Madhya Pradesh, BJP will not be seen
अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एका कागदावर लिहून दिले होते, 27 वर्षांचे भाजपचे कुशासन गुजरात मध्ये संपणार आणि आम आदमी पार्टी सरकार बनवणार. राहुल गांधींनी देखील आजच्या पत्रकार परिषदेत तसेच म्हटले आहे. राहुल गांधी पत्रकारांना म्हणाले, की तुम्ही लिहून घ्या, मध्य प्रदेशात 2023 मध्ये काँग्रेस जिंकणार आणि भाजप हरणार. भाजप या निवडणुकीनंतर मध्य प्रदेशात दिसणारही नाही. मध्य प्रदेशच्या लोकांना हे माहिती आहे की भाजपने पैसे खायला घालून इथले सरकार बनवले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातल्या लोकांच्या मनात भाजप विरुद्ध प्रचंड राग आहे. त्यामुळे भाजप मध्य प्रदेशात हरेल आणि काँग्रेस जिंकेल, हे तुम्ही लिहून घ्या!!
मध्य प्रदेश भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी या यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधींना मुंगेरीलालची हसीन सपने पाहायची असतील, तर त्याला आम्ही हरकत घेणार नाही, असा टोला मध्य प्रदेश भाजपच्या नेत्यांनी लगावला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम आदमी पार्टी जिंकणार, हे जे लिहून दिले होते त्याचे नेमके काय झाले??, हे जनतेने पाहिले आहे!! 182 जागांच्या गुजरात विधानसभेत आम आदमी पार्टीला 5 जागा मिळाल्या. भाजपला 154 जागा मिळाल्या आणि काँग्रेस 77 जागांवरून 21 जागांवर आली. आता ज्यावेळी राहुल गांधी मध्य प्रदेशाच्या बाबतीत काँग्रेस जिंकणार आणि भाजप हरणार. भाजप मध्य प्रदेशात दिसणारही नाही, हे जेव्हा लिहून घ्यायला सांगत आहेत, त्यावेळी नेमके काय घडणार?? हे मध्य प्रदेश विधानसभेच्या 2023 च्या निवडणुकीत सिद्ध होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App