विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटक विषयाची डोक्यात गेली हवा म्हणून मध्य प्रदेशात काँग्रेसला हव्यात 150 जागा अशी आज काँग्रेसची स्थिती आहे. कर्नाटक विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज राजधानीत राहुल गांधी यांच्यासह मध्य प्रदेशातल्या काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे नियोजन केले. Congress wants 150 seats in Madhya Pradesh!!
प्रदेश पातळीवरील काँग्रेस नेत्यांकडून फीडबॅक घेतले. राहुल गांधींनी आपल्या जवळचे फीडबॅक मध्यप्रदेशच्या काँग्रेस नेत्यांना दिले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी कर्नाटकात काँग्रेसला 136 जागा मिळाल्या. त्यामुळे मध्य प्रदेशात आम्हाला 150 जागा मिळतील, असे सांगून एवढाच बाईट देऊन निघून गेले.
कर्नाटकात मुस्लिम समाजाने त्यांच्या एकूण मतांपैकी 88% मते काँग्रेसला दिली, असे तिथल्या वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी जाहीरच केले होते. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाची 5 % मते काँग्रेस आपल्याकडे खेचण्यात त्यामुळेच यशस्वी झाली. परिणामी काँग्रेसला 224 पैकी 136 जागा मिळाल्या. आता कर्नाटक मधला हा विजय काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात गेला असून त्यामुळेच त्यांनी मध्य प्रदेशातले टार्गेट 230 जागांपैकी 150 जागा एवढे मोठे ठेवले आहे. हे टार्गेट फक्त त्यांनी बैठकीत ठरवले असे नाही, तर राहुल गांधी यांनी ते माध्यमांसमोर जाहीरही केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App