काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांचा भाजपात प्रवेश

बीबीसीच्या माहितीपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर काँग्रेसपासून फारकत घेतली होती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. केरळमधील काँग्रेस नेते अनिल अँटनी यांनी २००२ची गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या माहितीपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर जानेवारीमध्ये काँग्रेसपासून फारकत घेतली होती. भाजप नेते पीयूष गोयल, व्ही मुरलीधरन आणि पक्षाच्या केरळ युनिटचे प्रमुख के सुरेंद्रन यांनी आज एका औपचारिक कार्यक्रमात त्यांचे भाजपात स्वागत केले. Congress veteran AK Antonys son Anil Antony joins BJP


“कविता कमी आणि इतिहास जास्त वाचा”; ज्योतिरादित्य शिंदे यांचा जयराम रमेश यांना टोला!


अनिल अँटनी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे मत आहे की ते एका कुटुंबासाठी काम करत आहेत. पण माझे मत होते की मी काँग्रेससाठी काम करतोय.” ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भारताला जगात आघाडीवर आणण्याचा अत्यंत स्पष्ट दृष्टीकोन आहे.”

याशिवाय, अनिल अँटनी म्हणाले, ‘’धर्म रक्षति रक्षत असा माझा विश्वासत आहे. आजकाल अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे एका कुटुंबासाठी काम करणे हा त्यांचा धर्म आहे, परंतु देशासाठी काम करणे हे माझे मत आहे. भारताला प्रसिद्ध बनवण्याची पंतप्रधानांकडे चांगली दृष्टी आहे. जे.पी.नड्डा, अमित शाह यांच्याकडे समाजात चांगले काम करण्याची इच्छाशक्ती आहे. देश मजबूत करण्यासाठी मी सुद्धा काम करेन.’’

Congress veteran AK Antonys son Anil Antony joins BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात