काँग्रेसने लावली कम्युनिस्टांच्या अखेरच्या गडाला घरघर ही खरी केरळ मधली बातमी!!

नाशिक : केरळ मधल्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा पराभव झाला आणि काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट जिंकले, ही झाली जुनी बातमी. पण भारतातल्या कम्युनिस्टांच्या अखेरच्या गडाला घरघर लागली, ही खरी केरळ मधून बातमी आली.

केरळ मधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कम्युनिस्ट यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. केरळच्या विधानसभा निवडणुका 2026 मध्ये होणार असताना त्याच्या आधी असा निकाल लागणे ही केरळ मधल्या कम्युनिस्टांसाठी अतिशय वाईट बातमी. कारण केरळ मध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातले एकमेव कम्युनिस्ट सरकार अस्तित्वात आहे. आता त्याला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने कम्युनिस्ट प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला पराभूत केले, तर संपूर्ण देशातला कम्युनिस्टांचा अखेरचा गड सुद्धा कोसळेल.



– तीन राज्यांमध्ये दीर्घकाळ सत्ता

कारण संपूर्ण देशात कम्युनिस्टांची राजवट फक्त तीन राज्यांमध्ये दीर्घकाळ चालली पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये कम्युनिस्टांनी अनेक वर्षे राज्य केले.

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींनी कम्युनिस्टांची राजवट कायमची संपविली. त्रिपुरामध्ये माणिक साहा यांनी भाजपची राजवट आणून तिथली कम्युनिस्टांची राजवट संपविली. त्यांच्या पाठोपाठ आता केरळ मधली कम्युनिस्टांची राजवट संपुष्टात यायला आज सुरुवात झाली.

वास्तविक संपूर्ण देशात काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे एकाच आघाडीत म्हणजे INDI आघाडीत आहेत. पण केरळमध्ये मात्र ते एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. केरळमध्ये सलग गेली 10 वर्षे कम्युनिस्टांचे स्थिर सरकार आहे. पण 2025 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या सरकारच्या विरोधात मतदान झाल्याची चुणूक दिसली. त्यामुळे कम्युनिस्टांच्या अखेरच्या सरकारला घरघर लागल्याचे उघड दिसून आले.

– कम्युनिस्टांच्या पराभवाचे श्रेय काँग्रेसचे

आता पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस आणि तिच्या मित्र पक्षांनी कुठल्या घोडचुका केल्या नाहीत, तर त्यांना केरळ विधानसभेमध्ये मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर कम्युनिस्टांची सत्ता संपूर्ण देशातून उखडली गेल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ देशातली कम्युनिस्टांची सत्तेची सद्दी संपविण्याचे श्रेय भाजपच्या ऐवजी काँग्रेसच्या गळ्यात पडेल, हेही विसरून चालणार नाही

Congress UDF finishing last communist rule

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात