नाशिक : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहिल्याचा काँग्रेसने एकीकडे दावा केलाय, पण दुसरीकडे सरकारने कोणताही आक्रमक निर्णय घेऊ नये, यासाठी त्यात काड्या घालायचा डावही आखलाय, असेच काँग्रेसच्या राजकीय वर्तनातून समोर आले.
पहलगाग मधल्या हल्ल्यानंतर सरकारने घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हजर राहिले. त्यांनी सरकारच्या आक्रमक भूमिकेला तिथे पाठिंबा दिला. बाकीच्या विरोधकांनीही काँग्रेसच्या आवाजात आवाज मिसळून सरकारच्या आक्रमक भूमिकेचे समर्थन केले. सगळा भारत एक आहे, असा संदेश आपण देऊ, अशी भूमिका विरोधकांनी त्या बैठकीत घेतली.
– काँग्रेसचे अनेक तोंडी बोल
पण नंतर मात्र सरकारच्या आक्रमक भूमिकेत अडथळा आणण्यासाठी काँग्रेसने वेगवेगळे डाव टाकले. राहुल गांधी एका तोंडाने बोलायला लागले, तर बाकीचे काँग्रेस नेते दुसऱ्या तोंडांनी बोलायला लागले. काँग्रेसच्या 7 नेत्यांनी टप्प्याटप्प्याने सरकारच्या विरोधी सूर काढला. यात प्रामुख्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महाराष्ट्रातले नेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश राहिला. या दोघांनीही पाकिस्तानशी युद्ध नको, असा सूर काढत पाकिस्तान धार्जिणी भूमिका जाहीर केली. पाकिस्तानातल्या सरकारने आणि तिथल्या माध्यमांनी सिद्धरामय्या यांचा “जयजयकार” केला. सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारला कसा “धडा” शिकवला याची वर्णने केली. म्हणून काँग्रेसने सगळ्या नेत्यांना शिस्तीची वेसण लावली. पहलगाम हल्ल्याबद्दल कोणी बोलू नये, असा फतवा काढला.
पण हा फतवा काढल्याच्या दिवशीच म्हणजे 28 एप्रिल 2024 रोजी मल्लिकार्जुन खर्गे यांनी जयपूर मध्ये जाऊन पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक हल्ला केला. मेरी 56 की छाती है, मेरा ये है वो है, घर मे घुसूंगा बोलते हे लेकिन सर्वपक्षीय बैठक मे नही आते, ये शरम की बात है!!, असे खर्गे चिडून म्हणाले. देशावरच्या संकट काळात पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका करू नये, याचे औचित्य भान खर्गे यांच्यासारख्या अनुभवी वयोवृद्ध पुढाऱ्याला देखील राहिले नाही.
पण काँग्रेसने त्या पलीकडे जाऊन आणखी एक मोठा डाव टाकला, तो म्हणजे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायचा. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायची मागणी केली. यातून काँग्रेसला पहलगाम हल्ल्यावरचा विषय “वाढवत” नेऊन तो वेगळ्या दिशेला न्यायचा आहे.
पण कुठलेही सरकार कुठलीही संरक्षण विषयक रणनीती अशी जाहीरपणे आखात नाही किंवा तिची वाच्यता देखील करत नाही आणि इथे तर पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशाशी सामना आहे त्यामुळे तर रणनीतीतली गुप्तता ही सर्वात मोठ्या धारदार शस्त्रासारखी असणार आहे, पण हीच रणनीती काँग्रेसला टोचते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अति आक्रमक धोरणातून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवू नये, आपल्या विशिष्ट “गेमा” चालू ठेवण्यासाठी तो देश तोडका मोडका का होईना, पण अस्तित्वात राहावा, हा काँग्रेसचा यातला सुप्त हेतू आहे. म्हणून काँग्रेसला भारताच्या आक्रमक रणनीतीची चर्चा संसदेच्या विशेष अधिवेशनात घ्यायची आहे. या चर्चेत वेगवेगळ्या सूचना करून काँग्रेस नेत्यांना त्या आक्रमक रणनीतीला वेगवेगळे फाटे फोडायचेयत. म्हणून संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी खरेदी आणि राहुल गांधी यांनी पुढे रेटली आहे.
– सोनिया + राहुल गांधींच्या संशयास्पद हालचाली
पण याच दरम्यान काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून संशयास्पद कृती घडल्याचे समोर आले. जगभरातल्या डाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल नावाच्या संस्थेचे प्रतिनिधी आज 10 जनपथ वर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवण्याची तयारी करत असताना त्याच बरोबर पाकिस्तान त्याच बरोबर पाकिस्तान विरोधात संपूर्ण देशात संताप उसळला असताना नेमके “पॉलिटिकल टायमिंग” साधून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनलच्या सदस्यांची भेट घेतली. भारतातल्या काही डाव्या संघटना या प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनलच्या सदस्य आहेत. यामध्ये मेधा पाटकर, अरुणा रॉय, सुनीती र. र. वगैरेंचा समावेश आहे. यांचे शहरी नक्षलवाद्यांशी निकटचे संबंध जगजाहीर आहेत. अशा प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनलच्या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याने या दोन्ही नेत्यांच्या राजकीय हालचालींविषयी संशय निर्माण झाला आहे.
त्याचवेळी दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी देखील समोर आली असून त्यामुळे तर राहुल गांधींच्या एकूण राजकीय भूमिकेविषयीच गडद संशय निर्माण झाला आहे. चिनी अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार राहुल गांधींनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याच्याशी फोनवरून बातचीत केल्याची ही बातमी आहे. अर्थातच या बातमीचे कोणीही कन्फर्मेशन केलेले नाही, पण या बातमीतून संशयाची दाट पेरणी मात्र झाली आहे.
त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या वक्तव्यावरून जरी आपले हात झटकून आपण “पाक” असल्याचे दाखवून दिले असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्या दोन अतिवरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय हालचालीतून जो संशय निर्माण झाला आहे, त्यावर मात्र पक्षातून कुणीही खुलासा द्यायला बाहेर आलेले नाही. ही बाब सर्वाधिक गंभीर आहे. त्यामध्ये आता काँग्रेसने संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीची भर घातली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App