विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या संकटकाळात काँग्रेसची अधम हरकत; पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले “गायब”!! असला राजकीय नीच कावा काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्ट मधून आज समोर आला. त्याचा देशभर प्रचंड निषेध झाला. Congress
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रातले मोदी सरकार पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायची तयारी करत असताना काँग्रेसने सरकारच्या आक्रमक रणनीतीत खोडा घालण्यासाठी वेगवेगळे डाव आखले, त्यातलाच एक डाव गायब पोस्ट मधून समोर आला.
काँग्रेसच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्स वर एक पोस्ट शेअर करण्यात आली त्यामध्ये मोदींसारखा पोशाख केलेला व्यक्ती उभा आहे असे दाखवून केवळ पोशाखच दिसतो आहे पण आतली व्यक्ती गायब आहे, असे दाखविले आहे. देशाच्या संकट काळात पंतप्रधान मोदी गायब असल्याचा दावा यातून काँग्रेसने केला आहे.
प्रत्यक्षात मोदी प्रचंड ऍक्टिव्ह असून त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह त्याचबरोबर सेनादलांच्या तिन्ही प्रमुखांबरोबर वेगवेगळ्या बैठका घेतल्या त्या बैठकांमधले कुठले तपशील बाहेर आले नाहीत, पण या बैठका झाल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या. याच दरम्यान पंतप्रधान मोदी फक्त दोनदा उघडपणे बोलले. त्यांनी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायचा निर्धार व्यक्त केला.
पण काँग्रेसला मोदींचा हा आक्रमक भावच खटकला. पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिले नाहीत याचे राजकीय भांडवल करून मोदी गायब असली अधम पोस्ट काँग्रेसने आपल्या मी सोशल मीडिया हँडलवर चालवली. मात्र देशात सगळीकडून त्या पोस्टचा तीव्र निषेध झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App