क्राऊड पुलिंग झाल्यानंतर काँग्रेस क्राउड फंडिंगच्या मागे; पक्षाला बऱ्याच वर्षांनी टिळक “आठवले”!!

विनायक ढेरे

नाशिक : क्राऊड पुलिंग झाल्यानंतर काँग्रेस क्राऊड फंडिंगच्या मागे; पक्षाला बऱ्याच वर्षांनी टिळक “आठवले”!!, असे काँग्रेसमधल्या एका ताज्या निर्णयाने समोर आले आहे. Congress to go for crowd funding for its foundation day, remembers tilak swaraj fund by mahatma gandhi

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसने 2023 च्या सहा महिन्यांमध्ये क्राऊड पुलिंगचा दक्षिणोत्तर प्रयोग करून पाहिला. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत गर्दी जरूर झाली, पण त्या गर्दीचा तेलंगण वगळता अन्य चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उपयोग झाला नाही. आता भारत जोडो यात्रेच्या क्राऊड पुलिंगचा उरलेला पूर्व – पश्चिम प्रयोग 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होणार आहे.

पण दरम्यानच्या काळात काँग्रेसने आपल्या पक्षाचा निधी वाढवण्यासाठी क्राऊड फंडिंगची योजना आखली आहे. या क्राऊड फंडिंगच्या योजनेच्या निमित्ताने काँग्रेसला बऱ्याच वर्षांनी लोकमान्य टिळकांची आठवण झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना लोकमान्य टिळकांची आठवण फक्त त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथीच्या दिवशी येत असते. सोशल मीडियावर टिळकांचे फोटो झळकवून काँग्रेस नेते त्यांना श्रद्धांजली वाहतात. अनेकदा गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंती अथवा पुण्यतिथीला देखील टिळकांच्याच फोटोला सोशल मीडियावर झळकण्याचे “भाग्य” लाभते. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर गोखले यांच्या ऐवजी टिळकांचा फोटो लागला आहे, याचे अनेक काँग्रेस नेत्यांना भानही राहात नाही, पण टिळक जयंती आणि पुण्यतिथी याव्यतिरिक्त काँग्रेस जणांना टिळक आठवत नाहीत हे मात्र खरे!!

पण आता काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस नेत्यांना लोकमान्य टिळकांची आठवण झाली आहे, हेही तितकेच खरे!! कारण काँग्रेसने 2024 ची निवडणूक लढवण्यासाठी क्राउड फंडिंगची योजना आखली आहे. 18 डिसेंबर पासून ते 28 डिसेंबर पर्यंत ही क्राउड फंडिंगची योजना असून काँग्रेसला 138 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरातील लोकांनी काँग्रेसला 138, 1038, अथवा 10,038 रुपयांची देणगी द्यावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे.


केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी “अशी” उडवली राहुल गांधींच्या भारत जोडो 2 यात्रेची खिल्ली!!


महात्मा गांधींचा टिळक स्वराज्य फंड

महात्मा गांधींनी 1921 मध्ये लोकमान्य टिळकांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली होती. त्या धर्तीवर काँग्रेसने स्वपक्षाच्या निधीसाठी क्राउड फंडिंगची योजना आखली आहे. महात्मा गांधींनी त्यावेळी संपूर्ण देशभरातून 1 कोटी रुपयांचा टिळक स्वराज्य फंड जमविण्याचा संकल्प सोडला होता. त्यापैकी 98 लाख रुपये जमल्याचा हिशेब लोकमान्य टिळकांच्या त्याच वर्षी प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी चरित्रात मिळतो. त्यावेळी ए. बी. गोदरेज या प्रख्यात उद्योगपतींनी तब्बल 300000 रुपये देऊन टिळक स्वराज्य फंडामध्ये मोलाचे योगदान दिले होते त्यावेळी अखंड हिंदुस्थानात असलेल्या 14 राज्यांनी मिळून बाकीचे 95 लाख रुपये जमविले होते.

अर्थात टिळक स्वराज्य फंड महात्मा गांधी यांच्या पुढाकाराने जमला असताना देखील तो जमवण्यात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या त्यावेळी झळकल्या होत्याच!! पण आता टिळक स्वराज्य फंडाच्या धर्तीवरच काँग्रेस आपल्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त क्राउड फंडिंग मार्फत निधी घेणार आहे, काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे.

काँग्रेसच्या 138 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेला बालेकिल्ला नागपूरमध्ये होणार आहे. तिथेच पक्षाची महारॅली आयोजित करून लोकसभा निवडणूक 2024 चे रणशिंग फुंकण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. त्याआधी 10 दिवस म्हणजे 18 डिसेंबर ते 28 डिसेंबर असा क्राऊड फंडिंगचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. बाकी काही का असेना, पण या क्राऊड फंडिंगच्या निमित्ताने का होईना, काँग्रेसला गांधी परिवार वगळून अन्य कुठल्या मोठा नेता आठवला हेही नसे थोडके!! हे “भाग्य” लोकमान्य टिळकांना लाभले हे आणखी विशेष!!

Congress to go for crowd funding for its foundation day, remembers tilak swaraj fund by mahatma gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात