
काँग्रेसच्या या घोषणेनंतर दिल्लीत काँग्रेस आम आदमी पार्टीविरुद्ध लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात I-N-D-I-A आघाडी केली आहे. मात्र ही आघाडी झाल्यापासून ती तुटल्याच्याच अधिक बातम्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. आता काँग्रेसने दिल्लीतील सातही जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत आम आदमी पक्ष राहुल गांधींच्या I-N-D-I-A मध्ये प्रवेश करू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. Congress to contest all Lok Sabha seats in Delhi INDIA is impossible for Aap to stay
काँग्रेसच्या या घोषणेनंतर दिल्लीत काँग्रेस आम आदमी पार्टीविरुद्ध लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात ही बैठक झाली. काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणाल्या, “तीन तास चाललेल्या बैठकीत राहुल गांधी, खर्गे, केसी वेणुगोपाल आणि दीपक बाबरिया उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील सर्व 7 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सात महिने बाकी असून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सातही जागांसाठी तयारी करण्यास सांगितले आहे.
दिल्लीत शेवटची लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झाली होती. भाजपाने सर्व 7 जागा जिंकल्या होत्या.
Congress to contest all Lok Sabha seats in Delhi INDIA is impossible for Aap to stay
महत्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्यदिनी गोव्यातील जनतेला भेट, सरकारी रुग्णालयात मोफत IVF असणारे देशातील पहिले राज्य
- बुर्ज खलिफावर झळकला तिरंगा; ‘हर घर तिरंगा’ आणि ‘जय हिंद’ केले प्रदर्शित; दिल्लीत राष्ट्रपती भवन, संसदही निघाली उजळून
- ब्रिटनमध्ये मोरारी बापूंची रामकथा, PM ऋषी सुनक यांचीही हजेरी; म्हणाले- पंतप्रधान म्हणून नाही, हिंदू म्हणून आलो!
- निष्ठावंत नेत्यांना 75 व्या वर्षी निवृत्त करणारे भाजपचे बॉस पवारांना 83 व्या वर्षी कुठली ऑफर देतील??