मोदींच्या वडिलांबद्दल अभद्र टिप्पणी करणाऱ्या काँग्रेस प्रवक्ते पवन खेडांना दिल्लीत विमानातून उतरविले; मोदींची कबर खोदण्याचा काँग्रेस नेत्यांच्या घोषणा!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना इंडिगो विमानातून दिल्लीच्या विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र, याचा संबंध काँग्रेसच्या नेत्यांनी पवन खेडा यांच्या अटकेशी जोडला असून मोदींची कबर खोदण्याच्या घोषणाही विमानतळावरच दिल्या आहेत. Congress spokesperson Pawan Kheda was dropped off at the Delhi airport by an Indigo flight

पवनखेडा यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल अभद्र टिपणी केली होती. त्यांच्या विरोधात लखनऊ तसेच आसाम मध्ये पोलिसांनी केस दाखल केली आहे. या संदर्भातली कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असताना पवन खेड हे दिल्ली विमानतळावरून इंडिगो विमानात बसून छत्तीसगडची राजधानी रायपूरला चालले होते. रायपूर मध्ये काँग्रेसचे 85 वे अधिवेशन आहे. या निमित्ताने सर्वच काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला, सुप्रिया श्रीनेत आदी काँग्रेस नेते रायपूरला जात होते. यात पवन खेडा यांचाही समावेश होता. परंतु पवन खेडा यांना रायपूरला न नेण्याच्या सूचना इंडिगो कंपनीला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पवन खेडा यांना विमानातून उतरवण्यात आले.

या सगळ्या घटना क्रमाचा काँग्रेस नेत्यांना प्रचंड राग आला. त्यामुळे सर्व नेते विमानातून उतरले आणि विमानतळावरच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू केले. “मोदी तेरी तानाशाही नही चलेगी”, “मोदी तेरी कबर खुदेगी”, अशा घोषणा दिल्या. सुप्रिया श्रीनेत यांनी एक व्हिडिओ शेअर करून पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला छत्तीसगडमध्ये ईडीचे छापे घालून काँग्रेस अधिवेशनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आणि आता पवनखेडांना विमानातून उतरवले ही मोदींची तानाशाही आम्ही चालू देणार नाही, असा इशारा सुप्रिया श्रीनेत यांनी दिला.

पवन खेडा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या कायदेशीर प्रक्रियेलाच काँग्रेस नेत्यांनी मोदींची तानाशाही असे नाव देऊन “मोदी तेरी कबर खुदेगी” अशा घोषणा दिल्याने विमानतळावरचे वातावरण तापले आहे. काँग्रेसच्या ट्विटर हँडल वरून या संदर्भातले काही व्हिडिओ देखील काँग्रेस नेत्यांनी शेअर केले आहेत.

Congress spokesperson Pawan Kheda was dropped off at the Delhi airport by an Indigo flight

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात