ट्रम्प आठ वेळा बोलल्याचे काँग्रेसला दिसले; पण का नाही दिसले, मोदींनी कसे कोलले??

Modi

नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आपण शस्त्रसंधी घडवून आणल्याचे डोनाल्ड ट्रम्प आठ वेळा बोलल्याचे काँग्रेसला दिसले, पण नरेंद्र मोदींनी त्यांना पुरते कोलले, हे मात्र काँग्रेसला का दिसू शकले नाही??, हा सवाल जयराम रमेश यांच्या वक्तव्यानंतर समोर आला.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामोफोसा यांच्याशी व्हाईट हाऊस मध्ये चर्चा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीचे आठव्यांदा श्रेय घेतले. भारत आणि पाकिस्तान यांना व्यापाराचे अमिष दाखवून आपण शस्त्रसंधी घडवून आणल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी रामोफोसा यांना सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत आठ वेळा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या शस्त्रसंधीचे क्रेडिट घेतले. म्हणजे त्यांनी आतापर्यंत आठ वेळा तशी वक्तव्य केली, असे काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी मोजून सांगितले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजूनही त्यांना प्रत्युत्तर तर दिले नाही, असा दावा त्यांनी केला.

ज्या जयराम रमेश यांना डोनाल्ड ट्रम्प यांची आठ वेळा केलेली वक्तव्ये मोजता आली, कारण त्यांना ती दिसली आणि ऐकू आली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आठ पैकी एकाही वेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना साधे उत्तरही न देता त्यांना “कोलले”, हे मात्र दिसू शकले नाही. ते पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना दिसले. म्हणूनच त्यांनी पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या ताज्या मुलाखतीत भारत कधीही अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारणार नाही, असे उघडपणे सांगितले.



वास्तविक बलाढ्य अमेरिकेच्या बलाढ्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुसती भुवई उंचावली किंवा एखादा उद्गार काढला तरी त्यावर जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांनी काहीतरी प्रतिक्रिया द्यायची, अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर धारण आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे आठ वेळा क्रेडिट घेतले. म्हणजे त्यांना स्वतःच्या तोंडाने आपण शस्त्रसंधी करवून घेतली, असे सांगावे लागले, तरी देखील भारताच्या पंतप्रधानांनी म्हणजेच नरेंद्र मोदींनी त्यांच्या वक्तव्याची साधी दखलही घेतली नाही किंवा त्यांना सकारात्मक किंवा नकारात्मक उत्तर देखील दिले नाही यातला political message जयराम रमेश यांच्यासारख्या “अतिउच्चशिक्षित” काँग्रेस प्रवक्त्याला कळला नाही, तरी तो पाकिस्तानी पंतप्रधानाला कळल्याशिवाय राहिला नाही‌.

– भारतीय भूमिका ठाम

डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ वेळा क्रेडिट घेऊनही नरेंद्र मोदींनी त्यांना प्रत्युत्तर तर दिले नाहीच, त्या उलट परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री, महाराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारताची भूमिका कायम जगासमोर मांडली. भारतीय सैन्याच्या प्रवक्त्यांनी देखील त्याचाच पुनरुच्चार केला. शस्त्रसंधी करावी, असा पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचा भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांना फोन आला. त्या दोघांमध्ये शस्त्रसंधी करायचा निर्णय झाला. भारताचे “ऑपरेशन सिंदूर” याचा पहिला भाग पूर्ण झाला होता म्हणून भारताने सैन्य कारवाई थांबवली, ही ती भूमिका होती आणि आहे‌. यात भारताने कुठलाही बदल केला नाही, असे वर उल्लेख केलेल्या प्रत्येकाने स्पष्ट केले. मात्र, ते जयराम रमेश यांना दिसले आणि ऐकू आले नाही. असे का बरं घडले असावे…??

Congress saw that Trump spoke eight times; but why didn’t they see, how did Modi get away with it??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात