Independence Day : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गैरहजर!!

मल्लिकार्जुन खर्गेंच्या रिकाम्या खुर्चीची सर्वत्र चर्चा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण देश उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करत. आज सकाळी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच ठिकाणी ध्वजारोहण झाले. नागरिकांनी भारत माता की जय…वंदे मातरम..  अशा घोषणा देत आपले राष्ट्राप्रतीचे प्रेम व्यक्त केले. त्याचप्रमाणे परंपरेनुसार दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा ध्वज फडकावला आणि देशाला संबोधित केले. Congress President Mallikarjun Kharge absent from flag hoisting program at Red Fort on Independence Day

या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने देशभरातून तब्बल १८०० विशेष व्यक्तींना निमंत्रित केले होतेच, शिवाय जगभरातूनही अनेक मान्यवर हा सोहळा पाहण्यासाठी आले होते. मात्र देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांचीच या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास गैरहजेरी होती.  त्यामुळे त्यांच्यासाठी राखीव असलेली खुर्ची रिकामीच राहिली आणि तिची चर्चा मात्र आता दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सुरू झाली आहे.

देशाच्या एवढ्या महत्त्वपूर्ण सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष का आले नाहीत? असा  प्रश्न सर्वांनाच पडला. अखेर खर्गेंच्या अनुपस्थितीचे कारण समोर आले आहे.

. सुरक्षेच्या कारणास्तव ते लाल किल्ल्यावर गेले नसल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले आहे. तसेच खरगे यांच्या कार्यालयाने सांगितले की, त्यांना त्यांच्या घरी आणि पक्ष कार्यालयावरही ध्वजारोहण करायचे होते. त्यामुळे त्यांना परतावे लागले आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी लाल किल्ल्याला भेट दिली नाही. खरगे सकाळी दहा वाजता पक्ष कार्यालयावर ध्वजारोहण करणार होते.

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित न राहण्याच्या प्रश्नावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ‘पहिली गोष्ट म्हणजे मला डोळ्यांशी संबंधित समस्या आहे. दुसरे म्हणजे, मला सकाळी ९.२० वाजता माझ्या निवासस्थानी आणि काँग्रेस मुख्यालयावर तिरंगा फडकावायचा होता. सुरक्षा एवढी कडेकोट आहे की पंतप्रधान जाण्यापूर्वी इतर कोणालाही परवानगी नाही… मला वाटले की मी इथे वेळेवर पोहोचू शकणार नाही आणि वेळ बघता सुरक्षेअभावी व परिस्थिती पाहता मी तिथे न जाणे उचित राहील.

Congress President Mallikarjun Kharge absent from flag hoisting program at Red Fort on Independence Day

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात