काँग्रेसने कधीच भाजपशी तडजोड केली नाही; जयराम रमेश यांचा नितीश कुमार यांना टोला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विरोधकांच्या ऐक्यासाठी काँग्रेसकडे पुढाकार घेण्याची आस लावून बसलेल्या नितीश कुमार यांना काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी जोरदार टोला हाणला आहे. विरोधकांची एकजूट महत्वाची आहेच. पण काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, ज्या पक्षाने भाजपशी कधीच तडजोड केली नव्हती, याची आठवण रमेश यांनी नितीश कुमार यांना करून दिली आहे. Congress never compromised with BJP; Jairam Ramesh’s tip to Nitish Kumar

पाटण्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया एमएल पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात नितीश कुमार यांनी विरोधी ऐकण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेण्याची मागणी केली होती. या अधिवेशनाला काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद उपस्थित होते. त्यांनी नितीश कुमार यांची वकील काँग्रेस श्रेष्ठींकडे करण्याचे वक्तव्य केले होते. पण नितीश कुमार यांच्या भाषणातला सूर पाहून काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी मात्र नितीश कुमार यांच्या राजकीय परस्परविरोधी तडजोडी करण्याच्या प्रवृत्तीवर बोट ठेवले आहे.


बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरू; पण मुख्यमंत्री नितीश कुमार अहवाल जाहीर करतील??


नितीश कुमार यांनी आधी भाजपशी तडजोड केली. मुख्यमंत्रीपद मिळवले. नंतर भाजपचा हात सोडून देऊन राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करून मुख्यमंत्रीपद टिकवले. नितीश कुमार यांनी हे दोनदा घडवून आणले. नितीश कुमार यांची आता बिहार सोडून देशाच्या राजकारणात पंतप्रधान पद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठीच त्यांना विरोधकांची एकजूट हवी आहे.
या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी त्यांना टोला हाणला आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसने अनेक पक्षांना निमंत्रण दिले होते. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी यांच्यासारखे पक्षाचे नेते भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर सामील देखील झाले होते. पण नितीश कुमार यांनी भारत जोडो यात्रेत सामील होण्याचे टाळले. त्यामुळे देखील जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांचे कान टोचले आहेत. आमच्या पुढे आमचा एक चेहरा आहेच आणि आम्ही भाजप विरोधात ठामपणे उभे आहोतच, अशा शब्दांत जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांच्या आवाहनाची वासलात लावली आहे.

Congress never compromised with BJP; Jairam Ramesh’s tip to Nitish Kumar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात