Waqf सुधारणा विधेयक संसदेत रोखण्यात काँग्रेस सह विरोधकांना अपयश; यापुढे काँग्रेसकडून कोर्टबाजी सुरू!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : waqf सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभा यांनी बहुमताने मंजूर केले संसदेत हे विधेयक रोखून धरण्यात काँग्रेस सह सगळ्या विरोधकांना अपयश आले त्यांचा संसदेच्या संख्याबळापुढे पराभव झाला. त्यामुळे आता काँग्रेसने waqf सुधारणा कायद्याविरोधात कोर्टबाजी करायचे ठरविले आहे. काँग्रेस लवकरच सुप्रीम कोर्टात संबंधित कायदा विरोधात याचिका दाखल करेल, अशी माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून दिली. Waqf Amendment Bill

Waqf सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभा यांनी दोन दिवस व्यापक विचार विनिमय करून बहुमताने मंजूर केले. भाजप काँग्रेस यांच्यासह सर्व पक्षाच्या खासदारांनी आपापली आग्रही मते संसदेच्या पटलावर मांडली. लोकसभेत 14 तास आणि राज्यसभेतही 12 ते 14 तास सलग चर्चा याच विषयावर झाली. त्यामध्ये शंभर पेक्षा जास्त खासदारांनी भाग घेतला. सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपापली मते अत्यंत आग्रहीपणे मांडून विधेयकाला पाठिंबा दिला किंवा विरोध केला.

पण या चर्चेमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, शरद पवार या महत्त्वाच्या नेत्यांनी भाग घेतला नाही. शरद पवार तर संपूर्ण विधेयकाच्या चर्चेच्या आणि मतदानाच्या वेळी संसदेत हजरच नव्हते. त्या उलट सरकारची बाजू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लावून धरली. BIMSTEK परिषदेसाठी थायलंड दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या चर्चेच्या दरम्यान संसदेत हजर नव्हते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे सर्व वेळ संसदेत उपस्थित होते.

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेस आणि विरोधकांना बहुमताची आशा नव्हतीच. त्यामुळे waqf सुधारणा विधेयक दोन्हीकडे मंजूर होणार हे निश्चित होते. त्यानुसार ते मंजूर झाले म्हणूनच आता काँग्रेसने संबंधित विधेयकाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जायचा निर्णय घेतला असून लवकरच काँग्रेस पक्षातर्फे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येईल असे जयराम रमेश यांनी ट्विटर वरून जाहीर केले. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस वेगवेगळ्या कायद्यान विरोधात लढत असल्याची यादीच ट्विटरवर सादर केली.

Congress MP Jairam Ramesh says, “The INC will very soon be challenging in the Supreme Court the constitutionality of the Waqf Amendment Bill

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात