विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानच्या चित्तौडगड येथे काँग्रेस आमदाराने एका पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याची बाब समोर आली आहे. एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय् असून ७ मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये काँग्रेस आमदाराने १०० पेक्षा जास्त शिव्या दिल्यात.Congress MLA abuses a police officer, 100 swear words in seven minutes
चित्तौडगडचे आमदार राजेंद्र सिंह बिधुडी यांची ७.३७ मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते भैंसरोदगड पोलीस स्टेशनचे एसएचओ संजय कुमार यांना १०० हून अधिक वेळा शिवीगाळ करताना ऐकू येत आहेत.या संदर्भात एसएचओ संजय कुमार यांनी आमदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आणि एका गुन्हेगारीच्या प्रकरणात एका व्यक्तीस अटक करण्यास दबाव टाकल्याचा तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय तर आमदार राजेंद्र सिंह बिधुडी यांनी ही ऑडीओ क्लिप बनावटी असल्याचा दावा केलाय. ते म्हणाले,ऑडिओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे, मी कधीही शिवीगाळ करत नाही.
या प्रकरणावर विरोधी पक्ष भाजपने चौकशीची मागणी केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मार्च रोजी करण्यात येणार आहे. या आधी एसएचओने चित्तौडगडच्या पोलीस अधिक्षक प्रीती जैन यांनी आमदाराच्या विरोधात लेखी तक्रार दिली होती आणि त्यांची बदली पोलीस लाइंस मध्ये करावी,अशी विनंती केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App