पडले तरी काँग्रेसचे नाक वर, वाढलेल्या टक्केवारीतून केली पराभवाची भलामण!!

नाशिक : पडले तरी काँग्रेसचे नाक वर; वाढलेल्या टक्केवारीतून केली पराभवाची भलामण!!, अशी काँग्रेसच्या नेत्यांची उपराष्ट्रपती पदाची निवडणूक हरल्यानंतर अवस्था झाली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित INDI आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला. पण तो नुसता पराभव झाला नाही, तर INDI आघाडीची मते फुटून तो पराभव झाला.

देशभर सगळीकडे हिंडून मतदान चोरीच्या विरोधात काहूर माजविणाऱ्या राहुल गांधींना INDI आघाडीच्या खासदारांची आहेत तेवढी मते सुद्धा टिकवता आले नाहीत. किमान 20 ते 25 मते या निवडणुकीत फुटली. ती कुणाची मते फुटली याविषयी चर्वितचरण सुरू असताना काँग्रेसने प्रादेशिक पक्षांवर आरोप करून घेतले, पण त्यापलीकडे जाऊन काँग्रेसने या पराभवाची मीमांसा आपण फार मोठे विजय झालो आहोत आणि मोदी सरकार धोक्यात आले आहे, अशा भाषेत केली.

पवारांचे एकजूटीचे फोटोसेशन फेल

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संसदेत मतदानाला जाण्यापूर्वी शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची एकजूट दाखविण्याचे फोटोसेशन केले. त्या फोटोसेशन नंतर ते एकत्र मतदानाला पोहोचले. सगळ्यांनी तिथे मतदान केले. पण पवारांचे दोन खासदार फुटल्याचे नंतर उघडकीस आले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पाच-सहा खासदार फुटल्याही दावे केले गेले. उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या खासदारांनी आणि तामिळनाडूतून द्रविड मुन्नेत्र कळघमच्या खासदारांनी आपापल्या पक्षांशी बंडखोरी केल्याचे बोलले गेले. पण मूळातच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने नेमके कोण फुटले??, हे सत्य बाहेर आले नाही.



प्रमोद तिवारींची वेगळीच मखलाशी

पण काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी वेगळीच मखलाशी केली. नेमकी हीच मखलाशी पडले तरी नाक वर; वाढलेल्या टक्केवारीतून केलेली भलामण अशी ठरली. उपराष्ट्रपतीपदाच्या आधीच्या निवडणुकीत विरोधकांच्या उमेदवाराला म्हणजेच मार्गरेट अल्वा यांना 26 % मते मिळाली होती, पण 2025 च्या निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार बी. सुदर्शन रेडी यांना 40 % मते मिळाली. याचा अर्थ विरोधकांची मते वाढली. सत्ताधारी आघाडीला विरोधी खासदारांची मते फोडावी लागली. यातच सत्ताधारी आघाडीचा पराभव दिसला. राजकीय संकट मोदी सरकारच्या दारात उभे आहे विरोधकांच्या वाढलेल्या मतांच्या टक्केवारी दिसले, असा दावा प्रमोद तिवारी यांनी केला. कुणाची मते कशी फुटली याची अधिकृत माहिती हाती आल्यानंतर आणखी बरेच बोलता येईल, असे सूचक उद्गार देखील त्यांनी काढले.

राहुल गांधींचे अपयश

पण देशात सगळीकडे हिंडून मतदान चोरीच्या विरोधात काहूर माजविणाऱ्या राहुल गांधींना विरोधी आघाडीची हातात असलेली मते सुद्धा टिकवता आली नाहीत. विरोधी पक्षांच्या खासदारांना आपल्याबरोबर राखता आले नाही. अत्यंत महत्त्वाच्या पण मतदार संख्येने अगदी छोट्या असलेल्या निवडणुकीत व्यवस्थित नियोजन करता आले नाही, हे राजकीय सत्य प्रमोद तिवारी यांना “पचले” नाही. त्यामुळे त्यांनी ते बोलून दाखविले नाही!!

Congress lost VP election, but drums beatan over increase in vote percentage

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात