संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन संपले, पण राहुल गांधी स्वतःभोवती काँग्रेस एकवटण्याशिवाय सरकारचा बाल तरी बाका करू शकले??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अर्थसंकल्प मांडणी आणि त्याआधी झालेले थोडेफार कामकाज त्यानंतर फक्त आणि फक्त गदारोळ, कामकाज तहकूब असे संसदेचे 2023 – 24 चे अर्थसंकल्पी अधिवेशन संपले. पण राहुल गांधी काँग्रेस आपल्या भोवती एकवटण्याशिवाय सरकारचा बाल तरी बाका करू शकले का??, हा खरा प्रश्न आहे.Congress lost an opportunity to corner modi government over adani issue in parliament budget session

 काँग्रेस “डी रेल”

गेल्या काही वर्षात काँग्रेस ही राजकारणाचे वळणच चुकते आहे. 2014 च्या पराभवापासून काँग्रेस मूलभूत राजकीय शहाणपणापासून जी “डी रेल” झाली आहे, ती पुन्हा रुळावरच आलेली नाही गेली. गेली 9 वर्षे फक्त आरडा ओरडा, मीडियातला गदारोळ आणि अधून मधून परदेशात जाऊन मोदी सरकार विरुद्ध भाषण यापेक्षा अशी एकही हालचाल काँग्रेसचे कुठलेच नेते करू शकलेले नाहीत, की ज्यामुळे मोदी सरकार प्रचंड हादरून जाणे सोडाच पण साधे घाबरले अथवा धास्तावलेले देखील नाही!!

काँग्रेस सारख्या दिग्गज पक्षाची अशी अवस्था होणे हा खरं म्हणजे लोकशाहीला धोका आहे!! कारण गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस खऱ्या अर्थाने राजकारणच करत नाही अशी स्थिती आहे.

 इंदिराजींचे डावपेचांचा मागमूसही नाही

काँग्रेसच्या फार जुन्या नाही, पण इंदिराजींच्या इतिहासात जरी डोकावले तरी इंदिराजी अशा काही डावपेच खेळायच्या की त्यांचे विरोधक त्यांना कायम टरकून असायचे. इंदिराजींच्या विरोधात हालचाली करणे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना आणि बाहेरच्या विरोधकांना शक्यच नसायचे, इतके इंदिराजींचे राजकारण तीव्र डावपेचांनी भरलेले होते. त्याचा मागमूस देखील गेल्या 9 वर्षांमध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेला दिसत नाही.

काँग्रेसचे डावपेच लयाला गेले

सोनियाजी यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात निश्चित प्रभावी राजकीय नेत्या होत्या. त्यांचे त्यावेळचे डावपेच निश्चित अडवाणींच्या नेतृत्वाखालच्या भाजपला पेचात आणणारे ठरले होते हे खरे, पण 2014 नंतर काँग्रेसला साप सुंगल्यासारखे होऊन काँग्रेसचे राजकीय शहाणपण आणि डावपेचच लयाला गेलेले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासारखा पक्षाध्यक्ष राहिलेली व्यक्ती देखील राजकीय दृष्ट्या पूर्ण सैरभैर झालेली दिसते आणि मोदी सरकारला ते राजकीय बुद्धीचातुर्य वापरून डावपेच खेळून म्हणूनच अडचणीत आणू शकलेले नाहीत.

भाजपची हुशारी नव्हे, काँग्रेसचा बिनडोक पणा

2023 – 24 चे अर्थसंकल्पी अधिवेशन एका अर्थाने काँग्रेसने वाया घालवले. राहुल गांधी यांनी गौतम अदानींच्या बेनामी 20000 कोटी रुपयांचा मुद्दा लावून धरला हे खरे, पण मध्येच त्यांनी सावरकरांचा मुद्दा काढून काँग्रेससाठी सेलफ गोल करून घेतला आणि तिथेच त्यांचे राजकारण फसले. गौतम अदानींच्या मुद्द्यावर मोदी सरकारला काँग्रेसला खऱ्या अर्थाने घेरताच आले नाही. अन्यथा मोदी सरकारला त्या मुद्द्यावर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमण्यात काँग्रेसला भाग पडत आले असते. पण काँग्रेस ते करू शकली नाही. यात भाजपच्या राजकीय हुशारीपेक्षा काँग्रेसचा राजकीय बिनडोकपणा जास्त कारणीभूत आहे.

सावरकर मुद्द्यावर सेल्फ गोल

राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांमध्ये थोडे “सिरीयस पॉलिटिशिअन” वाटायला लागले होते. पण त्यांनी लंडनला जाऊन केंब्रिज विद्यापीठात भाषण केले. त्यानंतर सुरत कोर्टाच्या निकालाचा जो परिणाम झाला त्यामुळे काँग्रेस राहुल गांधीं भोवती एकवटली आणि संसदेच्या महत्त्वाच्या अधिवेशनाकडे पक्षाचे पूर्ण दुर्लक्ष झाले. हा खऱ्या अर्थाने भाजपने डाव खेळल्याचे स्पष्ट झाले. म्हणजे ज्या मुद्द्यावर काँग्रेस भाजपला अडचणीत आणू पाहत होती, तोच मुद्दा भाजप सरकारने “डिफ्लेक्ट” करून काँग्रेसलाच अडचणीच्या जाळ्यात टाकून दिले. त्यातच राहुल गांधी सावरकर मुद्द्यावर काँग्रेससाठी सेल्फ गोल करून बसले. ही काँग्रेसची राजकीय दृष्ट्या अत्यंत दयनीय अवस्था आहे. भारतीय लोकशाहीसाठी देखील ही चांगली अवस्था नाही.

अदानी मुद्द्याचा खरा वापरच नाही

केंद्रातल्या मोदी सरकारला राजकीय डावपेच वापरून राजकीय बौद्धिक कौशल्याने अडचणीत आणणे खरंच कठीण नाही. सरकारमध्ये अनेक उणिवा निश्चित आहेत. त्या कोणत्याही सरकारमध्ये असतात. पण त्यासाठी विरोधी पक्ष राजकीय बौद्धिक पातळीवर फार सक्षम लागतो. तो राजीव गांधींच्या काळात होता. संख्येने कमी होता, पण विरोधकांमध्ये मधु दंडवते यांच्यासारखे बुद्धिमान विरोधक होते. त्यांना विश्वनाथ प्रताप सिंग यांची राजकीय ताकद मिळताच बोफोर्सचा मुद्दा त्यावेळेस संख्येने कमी असलेल्या विरोधकांनी राजीव गांधींवर उलटवून दाखवला होता. ते काँग्रेसला अदानी मुद्द्यावर मोदींविरोधात साध्य करता आलेले नाही. ही मोदींची हुशारी नव्हे, काँग्रेसचा राजकीय बिनडोकपणा आहे. खरंच काँग्रेसने संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन वाया घालवले आहे!!

Congress lost an opportunity to corner modi government over adani issue in parliament budget session

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात