
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी केंब्रिज विद्यापीठात जाऊन दिलेले लेक्चर, त्या पाठोपाठ ब्रिटिश पार्लमेंटच्या कमिटी मध्ये जाऊन दिलेले लेक्चर याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात भरपूर सुरू असताना दस्तूरखुद्द काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विरोधकांमधले काही बडे नेते चिंताक्रांत झाले आहेत. राहुल गांधींचे ब्रिटनमध्ये पोहोचलेले हे राहुल मिसाइल “मिस्ड फायर” होण्याचा धोका काही नेत्यांना वाटतो आहे. Congress leaders worried about rahul Gandhi’s cambridge lecture as it may missed fire against Congress itself
पण काँग्रेसमध्ये सध्याची स्थिती अशी आहे की, काँग्रेसच्या अध्यक्षपदी जरी 80 वर्षाच्या वरिष्ठ नेते असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांना बसवले असले तरी, राहुल गांधींना सल्ला देण्याची आणि त्यानुसार त्यांच्या वर्तणुकीची हमी देण्याची क्षमता कोणत्याही काँग्रेस नेत्यामध्ये नाही. पण तरी देखील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना राहुल गांधींचा सध्याचा ब्रिटन दौरा हा त्यांच्याच भारत जोडो यात्रेच्या यशावर पाणी फेरणारा वाटतो आहे. राहुल गांधींनी ब्रिटनमध्ये जाऊन चीन विषयी बोलण्यापेक्षा भारतात बेरोजगारी, इंधन दरवाढ याविषयी बोलले पाहिजे.
– ब्रिटन ऐवजी राजस्थान कर्नाटकचा दौरा करा
येत्या काही महिन्यांमध्ये राजस्थान, कर्नाटक सह अनेक राज्यांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष संघटनेत लक्ष घालून त्या राज्यांचे दौरे केले पाहिजेत, असे या वरिष्ठ नेत्यांना मनातून वाटते. त्यातही कर्नाटक आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमधून राहुल गांधींचे भारत जोडो यात्रा गेली आहे. या यात्रेला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याच्या परिणामाची फळे तोडायची वेळ आली असताना राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जाऊन चीन विषयी बोलतात किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आगपाखड करतात यातून मोदी आणि भाजपचाच फायदा होण्याची दाट शक्यता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आणि काँग्रेसची सहानुभूती बाळगणाऱ्या बाकीच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाटते आहे.
Shri @RahulGandhi had an insightful interaction with UK’s Members of Parliament, respected academics, journalists, community leaders and leaders of the Indian Overseas Congress at the Grand Committee Room, UK Parliament, earlier today. pic.twitter.com/cqSPRIAALR
— Congress (@INCIndia) March 6, 2023
– राहुलजींची मोदींची विरोध भक्ती!!
राहुल गांधी जितके नरेंद्र मोदींना टार्गेट करतील तितके भाजपला हवेच आहे. भाजपचा राहुल गांधी हे भाजपचे विरोध भक्ती करणारे नेते आहेत हेच भाजपमध्ये मानले जाते. त्याला ब्रिटन दौऱ्यात राहुल गांधी खतपाणी घालत आहे. याचा धोकादायक फटका अंतिमतः काँग्रेसला आणि बाकीच्या विरोधी पक्षांना बसू शकेल या चिंतेने काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी नेत्यांना ग्रासले आहे.
– कमाल मुनीर बरोबर स्टेज शेअर
पण राहुल गांधी त्यांचे ऐकायला तयार नसल्याची देखील त्यांची खंत आहे. राहुल गांधी ब्रिटनमध्ये केंब्रिज लेक्चर देताना पाकिस्तानी वंशाचे प्र कुलगुरू कमाल मुनीर यांच्याशी स्टेज शेअर करतात. ब्रिटिश पार्लमेंटच्या कमिटी रूम मध्ये लेक्चर देताना तिथल्या विरोधी लेबर पार्टीला सोबत घेतात आणि शेजारी सॅम पित्रोदांना बसवतात, ही सगळी क्रोनोलॉजी काँग्रेसच्याच काही नेत्यांना बिलकुल नापसंत आहे. पण राहुल गांधी विरुद्ध ब्र काढण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात कुजबूज करण्यापलिकडे त्यांची मजल गेलेली नाही. पण म्हणून काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी नेत्यांमधील अस्वस्थता लपलेली नाही.
Congress leaders worried about rahul Gandhi’s cambridge lecture as it may missed fire against Congress itself
महत्वाच्या बातम्या
- PMPML महिलांना घडवणार दर महिन्याचा 8 तारखेला मोफत प्रवास
- केनियामध्ये ड्रॅगनला विरोध : चिनी व्यावसायिकांविरोधात रस्त्यावर उरतली जनता, चायनीज मस्ट गोच्या घोषणा
- गुप्तचर यंत्रणांचा जवानांना अलर्ट जारी : सैनिक वा त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज फोन वापरू नयेत
- नागालँड-मेघालयात आज शपथविधी सोहळा : कॉनरॅड संगमा-नेफियू रिओ पुन्हा घेणार पदभार, PM मोदी-अमित शहांची उपस्थिती