काँग्रेसच्या नेत्यांना “चोर” या शब्दाचे एवढे आकर्षण का आहे?? रहस्य काय आहे??

नाशिक : काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना “चोर” शब्दाचे एवढे आकर्षण का आहे??, नेमकं रहस्य काय आहे??, असे सवाल काँग्रेसच्या नेत्यांच्या गेल्या काही महिन्यांमधल्या वर्तणुकीतून आणि राजकीय वक्तव्यातून समोर आलेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकनीती CSDS संस्थेच्या नादी लागून भले मोठे सर्वेक्षण करून घेऊन vote chori हा शब्द बाहेर काढला. त्यासाठी त्यांनी मोदी सरकारला घेरण्याऐवजी थेट निवडणूक आयोगालाच घेरले. निवडणूक आयोगाने मतदानाची चोरी केली, असा आरोप करत सुटले. शेवटी निवडणूक आयोगाला जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन मतदान यंत्रणा कशी काम करते, याचा कायदेशीर खुलासा करावा लागला. मतदार यादी तयार करणे आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविणे या दोन बाबी भिन्न कायद्यानुसार चालतात, हे राहुल गांधींच्या लक्षात आणून द्यावे लागले. पण राहुल गांधी बधले नाहीत. त्यांनी निवडणूक आयोगावर मतदान चोरीचे आरोप तसेच कायम ठेवले.

या दरम्यानच्या काळात CSDS चे संचालक संजय कुमार यांनी महाराष्ट्रातला मतदानाचा deta वाचन करण्यामध्ये आपल्या टीमची चूक झाली. त्यामुळे आपण तो डेटा मागे घेत आहोत. केलेल्या चुकीबद्दल माफी मागत आहोत, असे जाहीर करावे लागले. तरी महाराष्ट्रातल्या निवडणुका आयोगाने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले. हे केवळ “मतदान चोरी” या शब्दामुळे घडले.



 चुनाव आयोग नव्हे, चुराव आयोग

पण काँग्रेसने चोरी हा शब्द फक्त मतदाना संदर्भात वापरला नाही. त्यापलीकडे जाऊन आजच जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला “चुनाव आयोग” नाही, ‘चुराव आयोग” असे दूषण लावले. निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सुद्धा जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर आमच्या प्रश्नांची ते उत्तरे देत नाहीत. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या सर्वांना त्यांच्याकडे उत्तर नाही. निवडणूक आयोगाचे नामकरण “चुनाव आयोग” न ठेवता “चुराव आयोग” ठेवावे, अशी बडबड केली. इथेसुद्धा जयराम रमेश यांनी “चोरी” या शब्दाचे आकर्षण कायम ठेवले.

त्याआधी 2019 मध्ये काँग्रेसने मोदी सरकार संदर्भात विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ यांच्या संदर्भात “चोर” शब्द वापरला होता. मोदींनी ज्यावेळी “चौकीदार” शब्दाचा वापर केला, त्यावेळी “चौकीदार चोर” असे उत्तर काँग्रेसच्या नेत्यांनी दिले होते. त्यावेळी देखील काँग्रेसने “चोर” या शब्दावर भर दिला होता.

यातून हेच स्पष्ट झाले की काँग्रेसच्या नेत्यांना चोरी या शब्दाचे आकर्षण फार आहे. मराठी आणि हिंदी मध्ये चोरी या विषयावर काही म्हणी आहेत. चोरांच्या मनात चांदणे, चोरांच्या वाटा चोरांनाच माहिती, चोर तो चोर, वर शिरजोर, चोराच्या उलट्या बोंबा, चोर मचाये ज्यादा शोर या म्हणींच्या अनुषंगाने तर काँग्रेसच्या नेत्यांना चोरी या शब्दाचे आकर्षण वाटत असेल का??, काँग्रेसच्याच नेत्यांना या म्हणी लागू होतात का??, काँग्रेस नेत्यांच्या आकर्षणाचे या म्हणींमध्ये रहस्य दडले आहे का??

Congress leaders have attraction of the word chori

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात