राहुलजींच्या पंतप्रधानपदासाठी 31 डिसेंबर च्या मुहूर्तावर काँग्रेस नेत्यांची बॅटिंग; पण राहुलजी ‘जबाबदारी’ स्वीकारतील?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ज्या राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले आणि नंतर वारंवार नाकारले, त्या राहुल गांधींच्या पंतप्रधान पदासाठी काँग्रेस नेत्यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे आणि त्यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2022 च्या मुहूर्त निवडला आहे. Congress leaders bat for Rahul Gandhi’s prime ministerial candidature, but will he accept responsibility

राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाचा विषय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा छेडला आहे. कमलनाथांच्या वक्तव्याला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजधानी नवी दिल्लीतून दुजोरा दिला आहे.

पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपद सोडलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा पुन्हा खांद्यावर घेण्याचे नाकारली आहे, ते राहुल गांधी काँग्रेसच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीची जबाबदारी स्वीकारतील का??, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या पलिकडे जाऊन कमलनाथ आणि भूपेश बघेल यांच्या इच्छेनुसार राहुल गांधी हे सर्व विरोधी पक्षांचे मिळून पंतप्रधान पदाचे उमेदवार बनू शकतील का??, हा त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे.



भारत जोडो यात्रा कमालीची यशस्वी झाली आहे, असे मानून कमलनाथ यांनी राहुल गांधींची हॅट पंतप्रधान पदाच्या रिंग मध्ये टाकली आहे आणि त्यांना भूपेश बघेल यांनी दुजोरा दिला आहे. जगाच्या इतिहासात सर्वांत मोठी पदयात्रा राहुल गांधींनी काढली आहे. देशातली जनता त्यांच्यावर प्रेम करत आहे. काँग्रेसला या यात्रेचा निश्चित फायदा होईल. त्यामुळेच काँग्रेसने आणि सर्व विरोधी पक्षांनी मिळून 2024 च्या निवडणुकांना राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सामोरे जावे. त्यांना सर्व विरोधी पक्षांचे मिळून पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे, अशी सूचना कमलनाथ यांनी केली आहे. या सूचनेला भूपेश बघेल यांनी आपले वैयक्तिक मत जोडून राहुल गांधी हे काँग्रेसचे 2024 लोकसभा निवडणुकीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असले पाहिजेत, असे म्हटले आहे.

पण या मुद्द्यासंदर्भात मूळात 3 प्रश्न आहेत. पंतप्रधान पद ही देशाची सर्वोच्च “जबाबदारी” आहे. ही “जबाबदारी” राहुल गांधी उमेदवार म्हणून तरी स्वीकारतील का?? आणि काँग्रेसने जरी त्यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला तरी सर्व विरोधी पक्ष मिळून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देतील का?? आणि त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष भाजपच्या जबरदस्त ताकदीपुढे टिकून टक्कर देऊ शकतील का??, हे प्रश्नच मूळात राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीतली सर्वात मोठी आव्हाने आहेत.

… आणि या आव्हानांचे उत्तर इतर विरोधी पक्षांपेक्षा काँग्रेसला आणि दस्तूर खुद्द राहुल गांधी यांना समाधानकारक रीतीने द्यावे लागणार आहे. हे समाधान केवळ काँग्रेसला वाटून चालणार नाही, तर इतर पक्षांनाही ते उत्तर समाधानकारक वाटले पाहिजे आणि त्यांनी ते स्वीकारले पाहिजे, ही यातली “राजकीय मेख” आहे.

Congress leaders bat for Rahul Gandhi’s prime ministerial candidature, but will he accept responsibility

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात