दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दिला निकाल
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sajjan Kumar १९८४च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील सरस्वती विहार भागात दोन शीख नागरिक जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांना जिवंत जाळण्याबाबत आहे. या काळात शिखांची कत्तल करण्यात आली आणि त्यांची घरे जाळण्यात आली.Sajjan Kumar
सुरुवातीला या प्रकरणाबाबत पंजाबी बाग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. नंतर न्यायमूर्ती जी.पी. माथुर समितीच्या शिफारशीवरून स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने आरोपपत्र दाखल केले. समितीने ११४ प्रकरणे पुन्हा उघडण्याची शिफारस केली होती, ज्यात हे प्रकरण समाविष्ट आहे.
१६ डिसेंबर २०२१ रोजी न्यायालयाने सज्जन कुमारविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १४७, १४८ आणि १४९ अंतर्गत, तसेच कलम ३०२, ३०८, ३२३, ३९५, ३९७, ४२७, ४३६ आणि ४४० आणि कलम १४९ अंतर्गत दंडनीय गुन्ह्यांसाठी आरोप निश्चित केले.
एसआयटीने आरोप केला आहे की सज्जन कुमारने जमावाला हल्ला करण्यास प्रवृत्त केले, त्यानंतर जमावाने सरदार जसवंत सिंग आणि सरदार तरुणदीप सिंग यांना जिवंत जाळले आणि त्यांच्या घरातील सामान लुटले. यादरम्यान त्याचे घरही जाळण्यात आले. या हल्ल्यात घरातील अनेक लोक जखमी झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App