वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजस्थानात पंजाब सारखा संपूर्ण नेतृत्व बदल करायचा की तिथले नेतृत्व फक्त “हलवायचे” याच्या जोरदार हालचाली सुरू असून काल मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी भेट घेतली होती. त्यानंतर आज सचिन पायलट हे सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी 10 जनपथ वर दाखल झाले आहेत. Congress leader Sachin Pilot arrives at 10, Janpath, to meet party’s interim president Sonia Gandhi over political developments in Rajasthan
अशोक गेहलोत यांनी काल सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी जे सांगतील त्या पद्धतीने राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. राज्याला गतिमान प्रशासन देणे ही पक्षाची जबाबदारी आहे. ते आम्ही देऊ, असा खुलासा केला होता. त्याच वेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि राजस्थानातल्या काँग्रेसच्या संघटनात्मक बाबी याविषयी पक्षाचे प्रभारी अजय माकन हे जास्त माहिती देऊ शकतील, असे वक्तव्य देखील अशोक गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते.
या राजकीय पार्श्वभूमीवर आज सचिन पायलट हे सोनिया गांधी यांच्या भेटीला आले आहेत. कालच्या अशोक गहलोत यांच्या भेटीच्या वेळी त्यांना मंत्रिमंडळात सर्व गटांना सामावून घेण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिल्याच्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमांनी दिल्या होत्या.
Delhi | Congress leader Sachin Pilot arrives at 10, Janpath, to meet party's interim president Sonia Gandhi over political developments in Rajasthan pic.twitter.com/IcX0jY2198 — ANI (@ANI) November 12, 2021
Delhi | Congress leader Sachin Pilot arrives at 10, Janpath, to meet party's interim president Sonia Gandhi over political developments in Rajasthan pic.twitter.com/IcX0jY2198
— ANI (@ANI) November 12, 2021
आता तेथे फक्त मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की पंजाब मध्ये जसे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटवून नवे नेतृत्व आणले तसा राजस्थानात नेतृत्व बदल होईल?, याविषयी राज्य राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीला संपूर्ण वर्ष दीड वर्षाचा काळ शिल्लक आहे. 2023 मध्ये या निवडणुका आहेत. त्यापूर्वी सचिन पायलट यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडे मुख्यमंत्रिपद सोपवायचे की त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे अधिकारपद देऊन निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यायचे याविषयी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर खल चालू आहे.
तसे काहीही असले तरी आत्तापर्यंत अशोक गेहलोत यांच्या एकट्याचाच कारभार चालला होता त्याला आळा घालून इतर नेत्यांनाही महत्त्व देण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्याचे स्पष्ट होत आहे. अजय माकन यांच्या वक्तव्यातून देखील तसे स्पष्टपणे सूचित होताना दिसते.
अशोक गेहलोत हे आता सत्तरी पार झालेले वरिष्ठ नेते आहेत. कदाचित त्यांची “राजकीय व्यवस्था” केंद्रात करण्यात येऊ शकते आणि सचिन पायलट यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडे राजस्थानची संपूर्ण धुरा सोपविण्यात येऊ शकते. हे आत्ताच झाले नाही तरी अशोक गेहलोत यांचे एकहाती वर्चस्व मात्र इथून पुढे राजस्थान काँग्रेसमध्ये ठेवायचे नाही हा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App