राहुल गांधींनी आधी भारतीय सैन्यात काम करून दाखवावे, मग अग्निवीर योजनेविषयी बडबड करावी; जनरल व्ही. के. सिंग यांचा इशारा!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी इंडी आघाडी सत्तेवर आली, तर अग्निवीर योजना बंद करू, असे आश्वासन देऊन भारतीय सैन्य दलाविरुद्ध बडबड सुरू ठेवली आहे. परंतु, त्यांनी आधी भारतीय सैन्य दलात काम करून दाखवावे आणि मग अग्निवीर योजनेविषयी बडबड करावी, असा गंभीर इशारा माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी आज दिला. Congress leader Rahul Gandhi’s statement on the Agniveer scheme

राहुल गांधी आणि इंडी आघाडीतले बरेच नेते मोदी सरकारने सुरू केलेली अग्निवीर योजना बंद करण्याच्या बेतात आहेत किंबहुना त्यांनी तसा पणच केला आहे. हरियाणा मध्ये जाहीर सभेत बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका करताना अग्निवीर योजनेचा उल्लेख केला. हरियाणातील युवकांमुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. या युवकांच्या रक्तामध्ये आणि डीएनए मध्ये देशभक्ती भरली आहे. परंतु, मोदी सरकारने भारतीय सैन्याला मजुरांसारखे वागवायला सुरुवात केली आहे. त्यातूनच अग्निवीर सारखी योजना त्यांनी समोर आणली आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

या पार्श्वभूमीवर माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी राहुल गांधींनाच थेट आव्हान दिले. राहुल गांधींना भारतीय सैन्य दलाविषयी काहीही माहिती नाही. त्यांनी आधी भारतीय सैन्य दलात काम करून दाखवावे आणि मग अग्निवीर योजनेविषयी बडबड करावी, असे आव्हान जनरल व्ही. के. सिंग यांनी दिले.

जनरल व्ही. के. सिंग हे भारताचे लष्कर प्रमुख राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या आव्हानाला विशेष महत्त्व आहे आता हे आव्हान राहुल गांधी स्वीकारतात की अग्निवीर योजनेवर तशीच बडबड करत राहतात??, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Congress leader Rahul Gandhi’s statement on the Agniveer scheme

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात