विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षातर्फे कोरोनासंबंधीची श्वेातपत्रिका जारी करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंतच्या उद्रेकाचा अनुभव व त्यापासूनचा धडा आणि तिसऱ्या उद्रेकाच्या तयारीसंबंधीच्या सूचना यांचा समावेश आहे.Congress issues white paper on corona
कॉंग्रेस पक्षाच्या श्वे तपत्रिकेबाबत बोलताना पक्षाचे नेते राहुल गांघी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या उद्रेकाच्या वेळी लोकांचे जीव वाचविण्यास आलेले अपयश मोठे होते. पंतप्रधानांनी बळी पडलेल्या लोकांबद्दल अश्रू ढाळले परंतु ते अश्रू लोकांना प्राणवायू पुरवू शकले नाहीत आणि लोकांचे हकनाक गेलेले प्राण वाचवू शकले नाहीत.
कोरोनाविरुद्धच्या लढाईचे चार आधारस्तंभ आहेत. त्यामध्ये सार्वत्रिक व वेगवान लसीकरण हा मुख्य स्तंभ आहे. यानंतर प्रत्यक्ष कोरोना विषाणूंच्या मुकाबल्याच्या तयारीचा मुद्दा येतो. यात औषधे, प्राणवायूची निर्मिती आणि अखंड व नियमित पुरवठ्याची देशव्यापी यंत्रणा, व्हेंटिलेटर, रुग्णालये आणि बेडच्या उपलब्धतेत वाढ आणि अन्य उपकरणे व अत्यावश्ययक साधनसामग्री यांचा समावेश होतो.
ते म्हणाले, कोरोनाची व्याप्ती लक्षात घेऊन मुख्यतः दुर्बल व गरीब वर्गांना त्यांच्या अनुदानाच्या रकमा थेट त्यांच्या खात्यात जमा करणे(डीबीटी) यावर सरकारने विशेष लक्ष देण्याची आवश्यथकता आहे. त्याचप्रमाणे चौथा स्तंभ म्हणून सरकारने कोविड भरपाई निधीची स्थापना करावी. या निधीच्या माध्यमातून सरकारने कोविडग्रस्तांना आर्थिक साह्याची तरतूद करावी.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App