एआयचा वापर करून माझ्या आवाजाचे फेक व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत, असंही म्हटले आहे. Congress has opened a shop for making fake videos Prime Minister Modis legislation
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आणि आरोप केला की हा पक्ष बनावट व्हिडिओंद्वारे ‘जनतेची दिशाभूल’ करत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील धाराशिव येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “तुमचे जीवन बदलण्यासाठी मोदी अहोरात्र अथक परिश्रम करत आहे, तर विरोधी पक्ष, इंडिया आघाडी मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी सर्व शक्ती वापरत आहे. ”
काँग्रेस कधी लोकशाहीच्या नावाने, कधी संविधानाच्या नावाने तर कधी आरक्षणाच्या नावाने जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न करते, असे मोदी म्हणाले. त्यांचे घोटाळे उघडकीस आणल्याबद्दल त्यांचा आमच्यावर ‘राग’ आहे. ते म्हणाले, “आता त्यांनी बनावट व्हिडिओंची दुकानेही उघडली आहेत. बनावट व्हिडिओ बनवल्याबद्दल काँग्रेस आणि त्यांच्या सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मी तुम्हाला विचारतो की अशा खोट्या व्हिडीओची दुकाने बंद करावीत की नाही.”
सोमवारी कर्नाटकातील बागलकोट येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले होते, “हे सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. निवडणुकीत पराभूत झालेले लोक तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ बनवत आहेत. एआयचा वापर करून माझ्या आवाजाचे फेक व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. असा कोणताही व्हिडीओ तुम्हाला दिसला तर पक्षाला किंवा पोलिसांना कळवा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App