विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी भारत आणि चीन यांच्यातल्या वादात चीनची बाजू उचलून धरल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ठोकले. सच्चा भारतीय असलं काही बोलणार नाही, अशा परखड शब्दांमध्ये राहुल गांधींचे वाभाडे काढले. मात्र त्यावरून शरम वाटण्याच्या ऐवजी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश राहुल गांधींच्या बचावासाठी पुढे आले.
गलवान संघर्ष दरम्यान चीनने भारताची 2000 वर्ग किलोमीटर जमीन बळकावली आहे असे बेछूट वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. त्याबद्दल त्यांच्याविरोधात लखनऊ न्यायालयात बदनामीचा खटला दाखल झाला. लखनऊ न्यायालयाने त्यांच्याविरोधात समन्स जारी केले. त्या समन्सला राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. आजच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधी यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टिप्पणी केली. सच्चा भारतीय असलं कुठलंही बेताल वक्तव्य करणार नाही. चीनने 2000 वर्ग किलोमीटर जमीन बळकवली तुम्हाला कसे कळले?, तुम्ही तिथे होतात का?, तुम्ही हा मुद्दा संसदेत का मांडला नाही?, तो सोशल मीडियावर का लिहिला?, अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी केली.
सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ठोकल्याची सगळीकडे बातमी झाली. सोशल मीडियामध्ये चर्चा उसळली.
मात्र, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने ठोकले याविषयी शरम वाटण्याच्या ऐवजी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी राहुल गांधींची बाजू उचलून धरली. मोदी सरकारवर टीका केली. जयराम रमेश यांनी देखील संसदेत प्रश्न उपस्थित केला नाही, तर त्यांनी सोशल मीडियावरच मोदी सरकारचे धोरण DDLJ म्हणजे deny, distract, lie Justify असे असल्याची टीका केली. मोदी सरकार अधी वस्तूस्थिती नाकारते, नंतर त्या वस्तुस्थितीवरून इतरत्र लक्ष वळवते, खोटे बोलते आणि नंतर खोट्याचे समर्थन करते. मोदी सरकार कुठल्याही सवालांना समोरे जात नाही. सवालांची खरी उत्तरे देत नाही, असा दावा जयराम रमेश यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App