काँग्रेसने 26 लाख खोटे कर्जमाफी दाखले वाटले; मी काँग्रेससाठी काटणारा काळा कावळा; ज्योतिरादित्य शिंदेंचा टोला!!

वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसच्या कमलनाथ सरकारने आपल्या राजवटीत केलेले कार्यकारणाने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या प्रचार सभेत नुसतेच वाचून दाखवले नाहीत, तर जनतेच्या तोंडूनही ऐकवले. Congress filed 26 lakh fake loan waiver files

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा रंग भरत चालला असताना अनेक नेत्यांची वेगवेगळी वैचित्र्यपूर्ण वक्तव्य समोर येत आहेत. यापैकीच ज्योतिरादित्य शिंदे यांचे देखील एक वक्तव्य समोर आले आहे. काँग्रेससाठी आपण काटणारा काळा कावळा आहोत, असे ते म्हणाले आहेत.

प्रचार सभेत बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, की काँग्रेसच्या राजवटीत अनेक खोटी सर्टिफिकेट वाटली. त्यापैकी शेतकरी कर्जमाफी योजनेतील 26 लाख कोटी सर्टिफिकेट वाटली. काही सर्टिफिकेट तर माझ्या हस्तेही वाटण्यात आली. पण हिंदीत एक कहावत आहे, झूठ बोले कौवा काटे. तसा मी काँग्रेससाठी काटणारा काळा कावळा आहे. कारण काँग्रेस सरकारने केलेले कारनामे मी स्वतःच उघड बोलून दाखवत आहे. कारण त्यांनी तसे काळे कारनामे केलेच आहेत, त्याला मी तरी काय करणार??, असा टोला ज्योतिरादित्य शिंदे यांनी हाणला.

Congress filed 26 lakh fake loan waiver files

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात