विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात आधी घसरलेला टीआरपी थोडा वर आला. महाराष्ट्रसह देशभरातील माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. पण राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतला एक महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे झाकोळला गेला, तो म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार आहेत का?? Congress fears Rahul Gandhi’s prime ministerial candidature may disintegrate opposition unity before coming into existence
राहुल गांधींना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबद्दल याच पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता आणि त्याला उत्तर देताना राहुल गांधींनी, सध्या असा कोणताही विचार नाही. काँग्रेस फक्त भारत जोडो यात्रेवर फोकस करत आहे, असे उत्तर दिले. या उत्तरात राहुल गांधींची जशी राजकीय चतुराई दडली आहे, तशीच आपल्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीमुळे राजकीय भवितव्याची धास्ती देखील दिसून येत आहे. राहुल गांधी यांची पंतप्रधान पदाची उमेदवारी काँग्रेस उघडपणे जाहीर करताच नेमके काय होईल?? कोणत्या राजकीय शक्यता तयार होतील??, यांचा नुसता आढावा घेतला तरी, राहुल गांधींच्या मनातली धास्ती स्पष्ट होईल.
2019 चे अपयश
एकतर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मूळातच 2019 च्या लोकसभा निवडणुका लढवून झाल्या आहेत. म्हणजेच काँग्रेसचा त्यांच्या नेतृत्वाखालचा परफॉर्मन्स दिसला आहे आणि तो 54 खासदार एवढा आहे. 2014 च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला फक्त 44 खासदार निवडून आणता आले होते. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर म्हणजे 2017 नंतर त्यांनी जे काम केले, त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसला आपल्या खात्यात फक्त 10 खासदारांची भर टाकता आली. म्हणजेच पक्षीय पातळीवर काँग्रेसचा परफॉर्मन्स राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत तितकासा प्रभावी राहिला नाही, हे आकडाच सांगतो!!
विरोधी ऐक्यावर परिणाम
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींची पंतप्रधान पदाची उमेदवारी उघडपणे जाहीर केली तर, सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीचे नेमके काय होणार??, त्यावर परिणाम काय होणार??, हा सर्वाधिक कळीचा महत्त्वाचा मुद्दा आहे… ज्या क्षणी काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची उमेदवारी जाहीर करेल, त्या क्षणी विरोधी पक्षांचे ऐक्य निर्माण होण्यापूर्वीच कोसळून पडण्याची सर्वात दाट शक्यता आहे, असे राजकीय वर्तुळात आधीच मानले जात आहे. कारण पंतप्रधान पदावर कोणीही चालेल पण “गांधी” नको, यावर सर्व पक्षांचे एकमत आहे!! मुलायम सिंह यादव यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अखेरच्या लोकसभेच्या बैठकीत पंतप्रधान मोदींना “आप फिर एक बार प्रधानमंत्री बनीए”, असा अशा सदिच्छा दिल्या होत्या, त्याचे इंगित “गांधी” नको हेच होते!!
ममता, केजरीवाल, केसीआर, पवारांचे काय?
अशा स्थितीत राहुल गांधींचे उमेदवारी जर खरंच जाहीर झाली, तर ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, केसीआर चंद्रशेखर राव, एम. के. स्टालिन यांच्यासारखे प्रादेशिक नेते काँग्रेसच्या पाठीशी कितपत उभे राहतील??, या विषयी सर्वात मोठी शंका आहे. त्याचबरोबर गेले 30 वर्ष पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले शरद पवार हे ज्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या भारत जोडो यात्रेत त्यांच्याबरोबर चालायला तयार नाहीत, त्यांनी त्यांच्या ऐवजी खासदार सुप्रिया सुळे यांना पाठवले होते, ते शरद पवार राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला कितपत मनापासून पाठिंबा देतील??, याविषयी कोणालाही शंका नाही!!
– अंधूक आशा जिवंत
… हे सगळे मुद्दे जाणूनच राहुल गांधींनी अतिशय खुबीने आपण 2024 चे पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार का??, हा अकोल्यात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्न टाळला आहे… किंबहुना सध्या तो विचारही नाही असे सांगून विरोधी ऐक्याची अंधूकशी आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App