विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने जम्मू – काश्मीर मधून 370 कलम हटवल्यानंतर संपूर्ण देशभर प्रचंड गदारोळ माजवणाऱ्या काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मात्र कलम 370 ला हात घालायची हिंमत दाखवलेली नाही. काँग्रेसचे नेते जम्मू कश्मीर मध्ये 370 कलम पुन्हा लागू करू, अशी भाषा भाषणात वापरत होते. पण प्रत्यक्षात जाहीरनाम्यामध्ये मात्र त्याचा बिलकुलच त्यांनी उल्लेख केलेला नाही. जम्मू कश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू एवढेच आश्वासन देण्याची हिंमत काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरनाम्यातून दाखविली आहे.Congress dared not to touch upon restoring article 370 in jammu Kashmir
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जनतेला न्याय देताना 50 % आरक्षणाची मर्यादा काढून टाकणे, देशात जातनिहाय जनगणना करणे वगैरे आश्वासने दिली आहेत, पण जम्मू-काश्मीर सारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर, जिथे भाजपशी काँग्रेसचे मूलभूत मतभेद आहेत, त्या 370 कलमाच्या मुद्द्याला मात्र हात घालण्याची हिंमत काँग्रेसने केलेली नाही.
#WATCH दिल्ली: कांग्रेस पार्टी ने 2024 के लोकसभा चुनाव के लिए AICC मुख्यालय में अपना घोषणापत्र जारी किया।#LokSabhaElections2024 pic.twitter.com/Ev6oBPpqdv — ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2024
#WATCH दिल्ली: कांग्रेस पार्टी ने 2024 के लोकसभा चुनाव के लिए AICC मुख्यालय में अपना घोषणापत्र जारी किया।#LokSabhaElections2024 pic.twitter.com/Ev6oBPpqdv
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2024
2019 मध्ये भाजप सरकारने 370 कलम हटविल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आणि बाकीच्या विरोधकांनी देशभर प्रचंड गदारोळ माजवला होता. देशात पुन्हा सत्ता आली, तर जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम लागू करून संपूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची गर्जना काँग्रेस सह सगळ्या नेत्यांनी केली होती. परंतु प्रत्यक्षात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यावेळी जाहीरनाम्यात त्या संदर्भात लेखी आश्वासन देण्याची वेळ आली, त्यावेळी मात्र काँग्रेसने हात आखडता घेतला. जम्मू – काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याचे आश्वासन काँग्रेसने जरूर दिले, परंतु जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम तुला अंमलात आणू हे सांगण्याची हिंमत काँग्रेसने दाखवलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या एकूणच स्वघोषित धर्मनिरपेक्षता तत्त्वावर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App