विशेष प्रतिनिधी
कोलकाता: एकेकाळी चारशेच्या वर जागा मिळवून देशावर राज्य करणारी कॉँग्रेस पराभूत मानसिकतेतून बाहेर पडलेली नाही. २०२४ च्या निवडणुकांत कॉँग्रेसने केवळ १३० ते १४० जागांवर विजयाचे लक्ष्य ठेवले आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीच ही माहिती दिली आहे.Congress conceded defeat before 2024, targeting only 130 to 140 seats
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १२० ते १३० जागा जिंकेल. तसंच भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा असल्याचं सलमान खुर्शीद म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जवळपास ३०० जागा जिंकल्या. यापार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त १२०-१३० जागा जिंकण्याचं लक्ष्य काँग्रेसने ठेवलं आहे का? फक्त एवढ्या जागांवर काँग्रेस सत्तेत येईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रादेशिक पक्षांवर विसंबून आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपने २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली. त्यावेळी विरोधी पक्ष विखुरलेला होता. आता विरोध पक्ष एकजूट होत असल्याने भाजप संबंधित राज्यांमध्ये प्रदेशिक पक्षांच्या पाठिमागे लागली आहे.
कुठलाही नेता तर मग त्याला एक नेता म्हणून कसं समोर मांडणार? कुणी नेता असेल तर तो स्वत:हून पुढे येईल. सध्याच्या स्थितीत सर्व विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस चांगल्या स्थितीत आहे. यामुळे काँग्रेस १२०-१३० जागा जिंकू शकते, असं खुर्शीद म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये २४० ते २५० जागांवर थेट लढत होईल. यात काँग्रेस १०० ते १२० जागा जिंकून विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व करेल, असा दावा खुर्शीद यांनी केला. तसंच ममतांना विरोधी पक्षांचा नेता म्हणून समोर आणण्याबाबत खुर्शीद यांनी थेट कुठलंही उत्तर दिलं नाही. पण प्रादेशिक पक्षांना आता आपल्या भवितव्याबाबत ठरवावं लागणार आहे. कारण भाजप त्यांच्या पाठीमागे लागला आहे. यामुळे २०१९ च्या निवडणुकीतून सर्वांनी धडा घेतला पाहिजे, असं खुर्शीद म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App