काँग्रेसकडून बजरंग दलाची तुलना ‘पीएफआय’शी! मुख्यमंत्री सरमा यांनी साधला जोरदार निशाणा, म्हणाले…

Sarma and Congress

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू :  कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला अवघा एक आठवडा उरला आहे. बंगळुरूमध्ये काँग्रेसने मंगळवारी (२ मे) निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) केली आहे. यासोबतच या संघटनेवर बंदी घालण्याबाबतही बोलले गेले आहे. तर यावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वर्णन पीएफआय आणि कट्टर मुस्लिम संघटनांचा जाहीरनामा असे केले आहे. Congress compares Bajrang Dal with PFI Chief Minister Sarma hit a strong target

जाहीरनाम्यानुसार, काँग्रेसने म्हटले आहे की, ‘’जर त्यांना सत्ता काबीज करण्याची संधी मिळाली तर ते बजरंग दल आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालतील. जात किंवा धर्माच्या आधारावर समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे.‘’

याचबरोबर ‘’कायदा आणि राज्यघटना पवित्र आहेत, असे आमचे मत आहे. बजरंग दल आणि पीएफआय सारख्या व्यक्ती आणि संघटनांद्वारे बहुसंख्य किंवा अल्पसंख्याक समुदायांमध्ये शत्रुत्व किंवा द्वेष वाढवणाऱ्या इतरांकडून त्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. अशा कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्यासह आम्ही कायद्यानुसार निर्णायक कारवाई करू.’’ असंह काँग्रेसने म्हटलं आहे.

मुस्लिमांना खूश करण्यासाठी बजरंग दलावर बंदी – सरमा

काँग्रेसच्या अशा घोषणेवर आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, पीएफआयवर आधीच बंदी आहे. सिद्धरामय्या सरकारने पीएफआयचे खटले मागे घेतले आहेत त्यामुळे ते मुस्लिमांना खूश करण्यासाठी बजरंग दलावर बंदी घालणार असल्याचे सांगत आहेत. आम्ही बदला घेऊ असे पीएफआय म्हणू शकत नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचा जाहीरनामा पीएफआय आणि कट्टर मुस्लिम संघटनांच्या जाहीरनाम्यासारखा आहे.

२२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, मतमोजणी १३ मे रोजी होणार आहे. एकूण ३,६३२ उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी ७०७ भाजपचे, ६५१ काँग्रेसचे आणि १,७२० अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

Congress compares Bajrang Dal with PFI Chief Minister Sarma hit a strong target

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात