विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 1955 पासून ते अगदी 2022 पर्यंत चीनने भारताची जमीन बळकावली. पण या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यातील भांडणे केक कापणे आणि चायनीज सुप पिणे या मुद्द्यांवर येऊन धडकली!!
भारत आणि कम्युनिस्ट चीन यांच्यातील संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरुमू यांना अभिनंदन पर संदेश पाठवला. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी चिनी राजदूता बरोबर एका समारंभात भाग घेऊन केक कापला.
हा मुद्दा राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केला. पण त्यावेळी त्यांनी मोदी सरकारला चिमटे काढले. चीनने भारताची ४००० किलोमीटर भूमी बळकावली आणि आपले अधिकारी चिनी अधिकाऱ्यांबरोबर केक कापताहेत. भारताचे परराष्ट्र धोरण ढिल्ले पडले आहे. पंतप्रधान काय करताय??, असा बोचरा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधींच्या सवालाला भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस राजवटीच्या काळात चीनने अक्साई चीन बळकावला. त्यावेळी काँग्रेसचे राज्यकर्ते हातावर हात ठेवून का बसले होते??, राजीव गांधी फाउंडेशन साठी काँग्रेसने चीनकडून पैसे का घेतले??, डोकलाम संघर्षाच्या वेळी चिनी राजदूता बरोबर चायनीज सूप कोण पित होते??, अशा सवालांच्या तोफा अनुराग ठाकूर यांनी डागल्या.
1955 पासून 2022 पर्यंत चीनने बळकवलेली एकही इंच भूमी त्या देशाने भारताला परत केलेली नाही. आपल्या सैनिकांनी मात्र चिनी घुसखोरी परिणामकारक रित्या रोखली. पण काँग्रेस आणि भाजप यांच्यातील भांडणे लोकसभेच्या चव्हाट्यावर केक कापणे आणि चायनीज सूप पिणे या मुद्द्यांवर आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App