विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि “इंडी” आघाडी या दोन्ही गोटांमध्ये वेगवेगळे वातावरण आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्झिट पोलचा आत्मविश्वास घेऊन सरकार आल्यानंतरच्या 100 दिवसांच्या अजेंड्याची तयारी चालवली, तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन प्रत्यक्षातले लोकसभा निवडणुकीचे निकाल नाकारण्याची वातावरण निर्मिती केली. Congress arranged video conference of PCC presidents to get the feedback, it’s a move to reject the actual results
पंतप्रधान मोदींनी आज 7 बैठका घेतल्या. यामध्ये वादळग्रस्त राज्यांना मदतीबरोबरच देशातल्या उष्णतेच्या लाटेचा आढावा घेण्यासंदर्भातल्या बैठकींचा समावेश होता. पण त्या पलीकडे जाऊन मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत करायच्या कामांची, विशेषतः अजेंडा राबवण्याची तयारी करण्यासाठी ब्रेन स्टॉर्मिंग केले. मोदी पहिल्या शंभर दिवसांमध्येच देशाचा आर्थिक अजेंडा स्ट्रीम लाईन करून त्याचा पाया कसा असेल??, हे जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या चार वर्गांसाठी विशेष योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. या सगळ्याची तयारी मोदींनी आजच्या बैठकीत केल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. काल एक्झिट पोलचे निकाल जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी “इंडी” आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत “इंडी” आघाडीचा विजयाचा आकडा निश्चित करून तो मल्लिकार्जुन खर्गे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला होता. “इंडी” आघाडी 295 जागा जिंकेल, असे ते म्हणाले होते.
परंतु खर्गे यांनी 295 हा आकडा जाहीर करून तासभरच उलटला नाही, तोच एक्झिट पोलचा निष्कर्ष बाहेर आला. मोदी सरकार 350 पेक्षा जास्त जागा घेऊन सत्तेवर येईल, असा तो निष्कर्ष होता. अर्थातच या निष्कर्षाचा “इंडी” आघाडीला धक्का बसला. त्यामुळे काँग्रेसने संपूर्ण एक्झिट पोलच नाकारला. इंडिया आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी काँग्रेसच्याच बोलत बोल मिसळले.
परंतु, काँग्रेस केवळ एक्झिट पोलचा निष्कर्ष नाकारून थांबली नाही. काँग्रेसने मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसच्या देशातल्या सर्व राज्यांमधल्या प्रदेशाध्यक्षांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्यांच्याकडून त्यांच्या – त्यांच्या राज्यांमधल्या काँग्रेसच्या किती जागा निवडून येतील??, हा आकडा वदवून घेतला. यामध्ये महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील सहभागी झाले होते. त्यांनी काँग्रेसचा आकडा 17 पैकी 16 आणि “इंडी” आघाडीचा आकडा 40 सांगितला. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश वगैरे सगळ्या राज्यांच्या नेत्यांनी आपापल्या राज्यांचे काँग्रेसचे आकडे सांगितले. हे सगळे आकडे मिळून “इंडी” आघाडी 295 पर्यंत पोहोचल्याचे जयराम रमेश यांनी त्याच व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये जाहीर केले.
या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या निमित्ताने काँग्रेसने आपल्या प्रदेशाध्यक्षांकडून फीडबॅक घेऊन 4 जूनचे प्रत्यक्ष निकाल नाकारण्यासाठी वातावरण निर्मिती केली. काँग्रेसने एक्झिट पोल तर नाकारलाच, पण एक्झिट पोल नंतर व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन प्रदेशाध्यक्षांकडून थेट आकड्यांचा फीडबॅक घेतल्याने प्रत्यक्ष निकाल नाकारण्यासाठी पक्षाच्या नॅरेटिव्हला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर तो नाकारण्यासाठी काँग्रेस आपल्या प्रदेशाध्यक्षांचाच फीडबॅकचा वापर करणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App