नाशिक : ब्रिटिशांनी भारत सोडताना काँग्रेसला नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बसविले सत्तेवर; पण काँग्रेस नेत्यांनी फाळणीचे खापर फोडले. सावरकर + मुखर्जींवर!!, हे दारूण राजकीय सत्य आज समोर आले.
NCERT च्या पुस्तकात भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी याविषयीच्या पाठ्यक्रमामध्ये इतिहासकारांनी सत्य लिहिले. देशाची फाळणी इंग्रज + काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी केली. त्यासाठी मोहम्मद अली जिना माउंटबॅटन आणि जवाहरलाल नेहरू जबाबदार होते. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फाळणी स्वीकारणे भाग पाडले महात्मा गांधी आणि सरदार पटेल हे सुरुवातीला फाळणीच्या विरोधातच होते. पण तीन जून 1947 नंतर त्यांनाही फाळणीला मान्यता द्यावी लागली. कारण परिस्थिती तशी बनवली गेली होती, हे सत्य इतिहासकारांनी पुस्तकांमध्ये मांडले.
मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी NCERT च्या पुस्तकात लिहिलेले सत्य नाकारले. त्याउलट देशाच्या फाळणीसाठी त्यांनी मोहम्मद अली जिना, वीर सावरकर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जबाबदार ठरविले. काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद आणि प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषदा घेऊन वीर सावरकर आणि मुखर्जी यांच्यावर दुगाण्या झोडल्या. मौलाना फजलूल हक, मोहम्मद अली जिना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालच्या फाळणीच्या प्रस्ताव मांडला. तो मंजूर करून घेतला. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली. सावरकर आणि जिना यांना दोन वेगवेगळ्या धर्मांसाठी दोन वेगवेगळे देश हवे होते. ते त्यांनी इंग्रजांकडून करून घेतले आणि आता सध्याचे पंतप्रधान फाळणीसाठी काँग्रेसला नावे ठेवतात, अशा दावा बी. के. हरिप्रसाद यांनी केला.
– सत्तेचे सत्य दडपले
पण सावरकर आणि मुखर्जी यांच्यावर फाळणीसाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप करताना बी. के. हरिप्रसाद यांनी काँग्रेस सत्तेवर आल्याचे राजकीय सत्य दडपले. 14 ऑगस्ट 1947 रोजी देशाची फाळणी करताना इंग्रजांनी पाकिस्तानची सत्ता मोहम्मद अली जिना यांच्या हातात सोपवली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताची सत्ता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती सोपवली. मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनविले, तर जवाहरलाल नेहरूंना भारताचे पंतप्रधान केले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सावरकर आणि मुखर्जी हे दोन्ही नेते सत्तेवर आले नव्हते. पण हे सत्य हरिप्रसाद यांनी मांडले नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पंडित नेहरूंनी नंतर भारतातल्या सत्तेमध्ये सामावून घेतले होते.
– हिंदू बहुसंख्यांक पश्चिम बंगाल भारतात
मौलाना फजलूल हक आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालच्या फाळणीचा प्रस्ताव मांडला, पण या फाळणीमुळे अखंड बंगाल मधला हिंदू बहुसंख्य असलेला पश्चिम बंगाल भारतामध्ये सामील होऊ शकला. अन्यथा संपूर्ण बंगाल पाकिस्तान मध्ये समाविष्ट करून घेण्याची मोहम्मद अली जिना यांची मागणी होती. पण सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्या मागणीला सुरुंग लावला. बंगालची फाळणी करून हिंदू बहुसंख्या असलेला पश्चिम बंगाल भारतात सामील करून घेतला हे सत्य स्वीकारून बी. के. हरिप्रसाद यांनी ते मांडले नाही.
– पूर्व पंजाब भारतात
बंगाल प्रमाणेच संपूर्ण पंजाब मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तान मध्ये सामील करून हवा होता. परंतु सावरकरांच्या प्रेरणेने मास्टर तारासिंग यांनी हिंदू बहुसंख्य असलेला पूर्व पंजाब भारतामध्ये सामील केला. त्यामुळे अर्धाच पंजाब पाकिस्तानला मिळाला पण या सत्याकडेही हरिप्रसाद यांच्यासारख्या काँग्रेस नेत्याने जाणून-बुजून दुर्लक्ष केले. त्यांनी भारताच्या फाळणीला फक्त सावरकर आणि मुखर्जी यांना जबाबदार ठरविले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App