उमेदवारी तिकिटाच्या बदल्यात लाच घेतात डीके शिवकुमार, कर्नाटक काँग्रेसच्या नेत्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटकमध्ये 10 मे 2023 रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यावर पक्षाच्या उमेदवारांकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. उमेदवारांना बी फॉर्म देताना काँग्रेस नेत्याने लाच मागितल्याचा आरोप केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे डीके शिवकुमार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.Complaint to Election Commission against DK Shivakumar, Karnataka Congress leader accepting bribe in exchange of nomination ticket

शोभा करंदलाजे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, डीके शिवकुमार यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारांकडून तिकिटाच्या बदल्यात पैसे घेतल्याचे उघडपणे मान्य केले आहे. भाजप नेत्याने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत हे लाचखोरीचे आणि आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. पैशाच्या बदल्यात तिकीट मिळवल्याचा आरोप असलेल्या शिवकुमार यांच्यासह उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणीही करंदलाजे यांनी केली आहे.



याआधी प्रदेश काँग्रेसचे प्रमुख शिवकुमार यांनी 29 मार्च 2023 रोजी प्रजा ध्वनी यात्रेत लोकांवर 500 रुपयांच्या नोटा उधळल्या होत्या. उघड्या बसमधून नोटा उधळल्याची तक्रारही त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आली होती. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून त्यात शिवकुमार नोटा उडवताना दिसत आहेत. यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. याशिवाय 2019 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे काँग्रेस प्रमुख डीके शिवकुमार हे तुरुंगवारीही करून आलेले आहेत.

वादांमुळे डीके शिवकुमार यांना त्यांचे उमेदवारी रद्द होण्याची शंका होती. ताज्या माहितीनुसार, कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला आहे. 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत यंदा एकूण 3044 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात मुख्य लढत आहे. निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे.

Complaint to Election Commission against DK Shivakumar, Karnataka Congress leader accepting bribe in exchange of nomination ticket

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात