राहुल गांधी आणि लालू प्रसाद यांच्या समर्थकांनी लावले पोस्टर्स
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Caste census posters पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला. मोदी मंत्रिमंडळाने देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात ९४ वर्षांनंतर जातीय जनगणना होणार आहे. २०११ च्या जनगणनेत जातींची गणना करण्यात आली होती परंतु त्याची माहिती कधीही उघड करण्यात आली नाही.Caste census posters
आता मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत विरोधी पक्षांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. काँग्रेस जातीय जनगणनेच्या निर्णयाला राहुल गांधींचा विजय म्हणत असताना, राजदने पाटण्यात पोस्टर लावून या निर्णयाचे श्रेय लालू यादव आणि तेजस्वी यादव यांना दिले आहे.
देशात जातीय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेस आणि राजदने पाटण्यामध्ये पोस्टर्स लावले आहेत. काँग्रेसच्या पोस्टरमध्ये राहुल गांधींचे आभार मानले आहेत आणि आरजेडीच्या पोस्टरमध्ये लालू-तेजस्वी यांचे आभार मानले आहेत. काँग्रेसच्या पोस्टरवर लिहिले आहे: सरकार कोणाचेही असो, फक्त गांधींची व्यवस्था चालेल. त्याच वेळी, दिल्लीच्या रस्त्यांवर पोस्टर्स लावण्यात आले आहेत. जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींच्या पोस्टरसह लिहिले – झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App