वृत्तसंस्था
ढाका : Maulana Zubair बांगलादेशची राजधानी ढाक्यापासून 40 किमीवरील टोंगी येथील इस्लामिक सभा ‘इज्तेमा’च्या आयोजनावरून मौलाना साद व मौलाना जुबेर यांच्या समर्थकांत हिंसक धुमश्चक्री उडाली. यात किमान ४ जणांचा मृत्यू, तर १०० हून जास्त लोक जखमी झाले. परंतु या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. प्रशासनाने या परिसरात कलम १४४ लागू केले असून लष्कर तैनात करण्यात आले आहेत. मौलाना साद व मौलाना जुबेर समर्थकांत आधी टोंगी व परिसरात संघर्ष उडाला. त्यानंतर ताज्या घटनेत ढाका मेडिकल कॉलेजमध्ये हिंसाचार झाला. येथे उपचारादरम्यान दौन्ही पक्षांच्या समर्थकांनी परस्परांवर हल्ला केला. लष्करालादेखील ढाका मेडिकल कॉलेजमध्ये तैनात केले. गृह खात्याचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) मोहंमद जाहंगीर आलम चौधरी म्हणाले, 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.Maulana Zubair
५ ऑगस्टला अवामी लीग सरकार कोसळल्यानंतर जुबेर समर्थकांनी टोंगी इज्तेमा दोन टप्प्यांत घेतला जाऊ नये अशी मागणी लावून धरली. मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी दोन टप्प्यांतील इज्तेमाची सुरुवात झाली होती, असा दावा अवामी लीगने केला. साद समर्थक हे भारताचे एजंट असल्याचा आरोप जुबेर समर्थकांनी केला. ऑक्टोबरपासून मौलाना साद यांच्या समर्थकांनी जुबेर समर्थकांच्या या दाव्याविरुद्ध जाहीर सभेत देशातील विविध ठिकाणी विरोध सुरू केला, परंतु या प्रकरणात प्रशासन जुबेर गटाची बाजू घेत असल्याचा आरोप साद समर्थकांनी केला आहे.
बांगलादेश पोलिस व स्थानिक सूत्रानुसार मौलाना साद समर्थक पुढल्या शुक्रवारपासून टोंगी इज्तेमा मैदानात 5 दिवसीय इज्तेमा आयोजित करू इच्छितात. परंतु मौलाना जुबेर समर्थक त्यांना रोखू इच्छितात. जुबेर समर्थकांनी आधीपासूनच इज्तेमा मैदान ताब्यात घेतले आहे. दोन्ही गटांत अनेक दिवसांपासून तणाव होता. मंगळवारी सकाळी सुमारे ३.३० वाजता साद समर्थक मैदानात प्रवेश करू लागताच दोन्ही गटांत संघर्ष उडाला.
मोहंमद साद कंधलवी एक भारतीय मुस्लिम विद्वान व प्रचारक आहेत. ते तब्लिगी जमातचे संस्थापक मोहंमद इलियास कंधलवी यांचे पणतू आहेत. ते तब्लिगी जमातच्या निजामुद्दीन गटाचे प्रमुख आहेत. २०१७ मध्ये मोहंमद साद कंधलवी यांची ऑल इंडिया व नंतर टोंगी इज्तेमा (बांगलादेश) मध्ये तब्लिगी जमातच्या प्रमुखपदी निवड झाली. तेव्हापासून दोन्ही गटांत वाद सुरू आहे. देशात एका मोठ्या समूहाचे नेतृत्व आधी जुबेर करत.
प्रतिबंधित दहशतवादी संघटना उल्फाचा म्होरक्या परेश बरुआला बांगलादेश उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. 2004च्या चटगाव शस्त्र तस्करी प्रकरणात माजी मंत्री लुत्फज्मा बाबर व त्यांच्या पाच साथीदारांची सुटका केली आहे. बरुआच्या मृत्युदंडाला जन्मठेपेत रूपांतरित केले आहे. हे प्रकरण 10 ट्रकमधून भारतविरोधी दहशतवादी संघटनेला दारूगोळा पुरवण्याशी संबंधित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App