कपूरथलाच्या गुरुद्वारात निहंग शीख आणि पोलिसांमध्ये चकमक, हवालदाराची हत्या!

तीन पोलिसही झाले जखमी रुग्णालयात केले दाखल

विशेष प्रतिनिधी

सुलतानपूर : पंजाबमधील कपूरथला येथे एका पोलीस हवालदाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वास्तविक, कपूरथला जिल्ह्यातील कसबा सुलतानपूर लोधी येथील गुरुद्वारा अकाल बुंगाच्या संचालनावर निहंग शिखांचा एक गट बाबा बुड्ढा दल मान सिंह ग्रुपने गुरुद्वारा साहिबवर कब्जा केला होता. तो ताबा हटवण्यासाठी पोलीस तेथे पोहोचले होते. यादरम्यान निहंग आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. Clash between Nihang Sikhs and police in Gurdwara of Kapurthala constable killed

चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. त्यामुळे एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला असून अन्य तीन पोलीस जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुलतानपूर लोधी येथील ऐतिहासिक गुरुद्वारा श्री बेर साहिब समोर असलेल्या निहंगांच्या गुरुद्वारा अकाल बुंगाच्या ताब्यावरुन निहंगच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादाने गुरुवारी धोकादायक वळण घेतले आणि पोलीस व नागरी प्रशासन हे सोडवण्यात अपयशी ठरले.

Clash between Nihang Sikhs and police in Gurdwara of Kapurthala constable killed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात