वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गुरुवारी (9 मे) नवी दिल्लीत पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिरंजीवी आणि वैजयंती माला यांना चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (25 जानेवारी) विजेत्यांची घोषणा करण्यात आली. चिरंजीवी, वैजयंतीमाला आणि सिनेविश्वातील प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांची पद्मविभूषणसाठी निवड करण्यात आली होती.Chiranjeevi and Vyjayanti Mala honored with Padma Vibhushan; Second highest civilian honor from the President
कोनिडेला चिरंजीवी
68 वर्षीय अभिनेता चिरंजीवीने 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी 2008 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये प्रजा राज्यम पार्टी हा राजकीय पक्ष सुरू केला. चिरंजीवी यांना 2006 मध्ये पद्मभूषण मिळाले आहे.
वैजयंती माला
87 वर्षीय वैजयंती माला 50 आणि 60 च्या दशकातील एक उत्तम अभिनेत्री होत्या. वैजयंतीमाला यांनी वयाच्या 13 व्या वर्षी तमिळ चित्रपटांमधून करिअरला सुरुवात केली. आशा, नया दौर, साधना, मधुमती यांसारखे उत्कृष्ट चित्रपट त्यांनी इंडस्ट्रीला दिले आहेत.
पद्मा सुब्रमण्यम
पद्मा सुब्रमण्यम या भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्या रिसर्च स्कॉलर, कोरिओग्राफर, शिक्षिका, इंडोलॉजिस्ट आणि लेखिकादेखील आहेत. पद्म यांच्या सन्मानार्थ जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशियामध्ये अनेक चित्रपट आणि माहितीपट बनवले गेले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App