वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तिबेटी सैनिक आता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या वतीने लडाख आणि अरुणाचल प्रदेश सीमेवर चीनसोबतच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय सैन्यासमोर उभे राहिलेले दिसतात.Chinese soldiers show their back in front of Indian army, Tibetan soldiers stand on the border
रिपोर्टनुसार, उच्च सीमेवर भारतीय सैनिकांशी लढताना चिनी सैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. 2020 मध्ये भारतासोबतच्या संघर्षात त्यांनी भारतीय जवानांची आक्रमकता आणि पर्वतांमध्ये लढण्याची क्षमता पाहिली होती. या कारणास्तव चीनने आपल्या ताब्यातील तिबेटमधील नागरिकांना सैनिक म्हणून भरती करण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरावर सैनिकांच्या दीर्घकालीन तैनातीसाठी त्यांनी प्रत्येक तिबेटी कुटुंबातील किमान एक सदस्य आपल्या सैन्यात भरती करण्याचे धोरण आखले आहे. भारतीय लष्कराच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सचे सैनिक आपल्या सैनिकांपेक्षा कितीतरी पटीने सरस असल्याचे चीनने पाहिले. विशेषत: कैलास पर्वतरांगेतील उंच शिखरे काबीज करताना तिबेटी सैन्याने त्यांच्या सैन्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
चीनच्या धोरणाला विरोध
तिबेटी सैनिकांची भरती करण्यासाठी चीनने आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना कामाला लावले. प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्याची भरती केली जात आहे, कारण चीनला असे वाटते की असे करून ते तिबेटी कुटुंबांना चीनशी एकनिष्ठ बनवण्याचा प्रयत्न करू शकतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App