ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येण्याची शी जिनपिंग यांची ऑफर; मोदींचा उत्साही, पण सावध प्रतिसाद; मोदींच्या चीन भेटीचा नेमका अर्थ काय??

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील टेरिफ तणावाच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगन आणि हत्ती यांनी एकत्र येण्याची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ऑफर दिली. त्या ऑफरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्साही पण सावध प्रतिसाद दिला. शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या आधी द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत शी जिनपिंग यांनी भारत आणि चीन यांच्या दीर्घ संबंधांचे गोड गुलाबी शब्दांमध्ये वर्णन करत ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येण्याची ऑफर दिली. Xi Jinping

भारत आणि चीन या दोन पूर्वेकडच्या जुन्या संस्कृती आहेत. आपल्या लोकांचे कल्याण करणे याची आपल्यावर ऐतिहासिक जबाबदारी आहे. आपण एकत्र आलो, तर मानवी संस्कृतीचा अधिक चांगल्या पद्धतीने विकास करू शकू. आपण चांगले शेजारी असणे, आपल्यातले संबंध चांगले राखून मैत्री करणे हेच आपल्या दोन्ही देशांसाठी अतिशय योग्य आहे. आपल्या एकमेकांच्या सहकाऱ्यांमध्ये एकमेकांचे यश सामावले आहे. नव्या जगात ड्रॅगन आणि हत्ती एकत्र आले पाहिजेत, अशा शब्दांनी शी जिनपिंग यांनी द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

पंतप्रधान मोदींनी सुद्धा शी जिनपिंग यांच्या स्वागताला उत्साही पण सावध प्रतिसाद दिला. मानसरोवर यात्रा सुरू केल्याबद्दल आभार मानले. भारत आणि चीन यांच्या सीमा व्यवस्थापन विषयक करार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांनी एकमेकांचा सन्मान राखून संबंध पुढे नेण्याबद्दल आशावाद व्यक्त केला.

सीमा वादाचा सकारात्मक उल्लेख

भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रम्प टेरिफ असताना सुरू असताना भारत आणि चीन जवळ येणे, त्यासाठी चीनने ऑफर देणे, या परिप्रेक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येण्याच्या प्रक्रियेला उत्साही, पण सावध प्रतिसाद दिला. भारत आणि चीन यांच्यातल्या सीमा वादाचा उल्लेख शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात केला नाही. कारण तो त्यांच्यासाठी सोयीचा नव्हता, पण मोदींनी भारत आणि चीन यांच्यातल्या सीमा वादाचा उल्लेख सकारात्मक पद्धतीने करून तो वाद अस्तित्वात आहे आणि तो सोडविण्यासाठी भारत कटिबद्ध आहे चीनला देखील कटिबद्ध व्हावे लागेल, असे स्पष्ट सूचित केले. यासाठीच त्यांनी एकमेकांचा आदर करायचा उल्लेख केला. Xi Jinping

ट्रम्प टेरिफचा चटका आधी भारताला बसला, पण भारताने तो सहन करून पुढची पावले टाकायला सुरुवात केली. याच्यापुढे ट्रम्प टेरिफचा चटका चीनला बसू शकतो, हे लक्षात घेऊन चीनने भारताला काही महिन्यांपूर्वीच एकत्र येण्याची ऑफर दिली होती. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन भेटीने फलद्रूप झाली. पण त्याचवेळी भारत आत्मनिर्भरतेचा रस्ता सोडणार नाही. आपल्या गतीने आणि आपल्या अटी शर्तींवर प्रगती साधत राहील हे सुनिश्चित करूनच पंतप्रधान मोदींनी ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सकारात्मक, पण सावध प्रतिसाद दिला.

पुतिन यांच्याबरोबरची भेट महत्त्वाची

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने मोदी युद्ध म्हणून भारतालाच धारेवर धरले. रशियन तेलाचा मुद्दा तापविला. या पार्श्वभूमीवर मोदी आणि पुतीन यांच्यातली भेट अधिक महत्त्वाची आहे. या भेटीमुळे ट्रम्प यांच्या नाकाला मिरच्या झोंबणार असल्या तरी भारत आणि रशिया यांच्या संबंधांच्या दृष्टीने मोदी आणि पुतीन यांच्यातली भेट अधिक महत्त्वाचे आहे कारण भारत आणि रशिया यांच्यातले आर्थिक त्याचबरोबर सामरिक हितसंबंध त्यामध्ये अधिक गुंतलेले आहेत. ट्रम्प यांनी कितीही आदळ आपट केली तरी भारत आणि रशिया यांच्यातल्या दृढ संबंधांमध्ये फट आणि फूट पडण्याची शक्यता नाही, हे दाखविणारी मोदी आणि पुतीन यांच्यातील भेट असेल.

Chinese President Xi Jinping offers to unite dragons and elephants

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात