विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एरवी भारताशी सीमेवरून पंगा घेणाऱ्या चीनला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा बडगा उगारताच भारताच्या मदतीची गरज भासू लागली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भाषेचा पिसारा फुलवून ड्रॅगन आणि हत्तीच्या एकत्र डान्सची संकल्पना मांडली. US tariff
भारत आणि चीन यांच्यात सीमावाद आहे. कारण चीन सातत्याने भारतीय सीमेत घुसखोरी करून भारतीय भूमी बळकवतो आहे. भारताबरोबरचा सीमावाद सोडवण्याची चीनची इच्छा नाही. पण तरी देखील भारताबरोबर व्यापार सहकार्य करण्यासाठी मधाचे बोट लावण्याची चीनची तयारी आहे.
हीच चिनी तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा बडगा चीनवर उगारताच ताबडतोब दिसली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ट्रम्प प्रशासनावर तोंडसुख घेताना भारताचे सहकार्य मागितले. अमेरिका जर चीन, भारत आणि अन्य देशांवर अन्याय करणारे टेरिफ लादणार असेल, तर सर्व देशांनी एकत्र येऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे. आपणच आपापसामध्ये भांडून स्पर्धा करण्यापेक्षा एकत्र येऊन अमेरिकन टेरिफच्या अन्यायाविरोधात एकत्रित आवाज उठवला पाहिजे, ड्रॅगन आणि हत्ती यांनी एकत्रित डान्स केला पाहिजे, असे ट्विट वांग यी यांनी केले. पण या ट्विटमध्ये वांग यांनी भारत – चीन सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी अवाक्षर देखील लिहिलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App