चीन अण्वस्त्र आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची क्षमता दुपटीने वाढ करतोय; पेंटॅगॉनच्या ताज्या अहवालात धक्कादायक खुलासा

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : चीन गेल्या पाच वर्षांपासून आपल्या अण्वस्त्रांमध्ये आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र यांमध्ये दुपटीने वाढ करण्याच्या मागे लागला आहे. अण्वस्त्रांच्या संख्येत तो अमेरिकेला येत्या दशकात मागे टाकेल, असा गंभीर इशारा पेंटॅगॉनच्या ताज्या अहवालात देण्यात आला आहे. China rapidly increasing its nuclear arms and ICBM double in current decade

दक्षिण चीन समुद्र तसेच मध्य आशियात आपले वर्चस्व वाढविण्यासाठी चीन आपली लष्करी ताकद दुपटीने वाढ करीत असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. वॉशिंग्टन पोस्टने ही बातमी दिली आहे.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र नियंत्रक कायद्याद्वारे किंवा कराराद्वारे चीनला रोखता येणार नाही कारण असे कोणतेही करार चीन मान्यच करत नाही याकडे अहवालात प्रामुख्याने लक्ष वेधण्यात आले आहे. अमेरिकन स्ट्रॅटेजिक कमांडचे कमांडर मिरज ऍडमिरल चार्ल्स रिचर्डस् यांनी याबाबत अधिक खुलासा केला आहे.



दक्षिण चीन समुद्रात चीन बांधत असलेल्या कृत्रिम बेटांवर तसेच आधीच बांधलेल्या कृत्रिम बेटांवर अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तैनात करतो आहे. यासाठी त्या देशाने संख्यात्मक पातळीवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे वाढवण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यावर प्रत्यक्ष काम सुरू आहे. त्याचबरोबर अण्वस्त्रांच्या संख्येत देखील त्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. चीनकडे आत्ताच जगातल्या दोन नंबरची म्हणजे अमेरिकेत खालोखालची अण्वस्त्रे अस्तित्वात आहेत. अण्वस्त्रांची संख्या देखील वाढविल्यावर अमेरिकेशी स्पर्धा करण्याची चीनची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. फक्त अण्वस्त्रांची गुणवत्ता वाढवण्याकडे चीनचा कल नाही, तर संख्या वाढविण्याकडे तो अधिक दिसतो आहे. कारण अण्वस्त्रांची गुणवत्ता वाढून अचूक मारक क्षमता निर्माण होऊ शकेल. परंतु चीनला त्यापेक्षा मोठ्या संहारक अस्त्रांचाची गरज वाटते आणि संख्यात्मक पातळीवरती वाढल्यावर अधिकाधिक क्षेत्रावर तिचा वापर वाढू शकतो, असे त्यांचे धोरण दिसते आहे. याकडे ऍडमिरल चार्ल्स रिचर्डस् यांनी लक्ष वेधले आहे.

त्यामुळेच अण्वस्त्रे आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रे यांच्या वाढीवर चीनच्या संरक्षण धोरणात येत्या दशकभरात सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याचा इशारा पेंटॅगॉनच्या अहवालात देण्यात आला आहे.

China rapidly increasing its nuclear arms and ICBM double in current decade

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात