वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या एका अहवालामुळे कोरोना प्रसाराबाबत संशयाची सुई पुन्हा एकदा चीनकडे वळली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार जगात होण्याच्या एक महिना आधी वुहान इन्स्टि ट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधील तीन कर्मचारी आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे अहवालात म्हटले आहे. China is source of corona virus
‘वॉल स्ट्रिट जर्नल’या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात आजारी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या व कालावधी, रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली आहे. त्यावरून कोरोना विषाणूचा प्रसार प्रयोगशाळेतून झाला, या संशयाला बळ मिळत असून त्याचा विस्तृत चौकशी करण्याची मागणी होऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीच्या वेळी गुप्तचर विभागाचा हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाच्या उगमाच्या चौकशीच्या पुढील टप्प्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज आहे. गुप्तचर संघनेटनेशी परिचय असलेले चीनमधील प्रयोगशाळेतील संशोधनाची माहिती असलेल्या आजी व माजी अधिकाऱ्यांनी या अहवालाच्या विश्वयसनीयेतेबाबत अनेक विचार मांडले आहेत. या प्रकरणी अधिक चौकशीची व अजून पुराव्यांची गरज असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव सांगितले.
कोरोनाच्या जागतिक साथीच्या प्रारंभीच्या दिवसांबद्दल आणि चीनमधील नागरिकांच्या माध्यमातून तो इतरत्र पोचला असल्याबद्दल अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाला गंभीर प्रश्ना पडले आहेत. जागतिक साथीचे मूल्यमापन कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय आणि राजकारणविरहित करण्यारी तज्ज्ञ मंडळी व ‘डब्ल्यूएचओ’बरोबर अमेरिकेचे सरकार काम करीत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App