Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!

Pahalgam attack

चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची, पण प्रत्यक्षात कृती मात्र पाकिस्तानला चिथावणीची देण्याची राहिली असल्याची बाब पहलगाम हल्ल्यानंतर समोर आली. पहलगामचा हल्ला झाल्यानंतर बाकी बड्या देशाच्या सगळ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोनवरून बातचीत केली. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इम्युअल मॅक्रोन, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आदी बड्या देशांच्या प्रमुखांचा समावेश होता. रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे देखील भारताच्या पाठीशी उभे राहिले. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला नाही.China instigate Pahalgam attack

पण चिन्यांची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीचीच राहिली. चिन्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आपापसातले मतभेद शांततेच्या आणि चर्चेच्या मार्गाने सोडवायला सांगितले. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी तशी ट्विट केली. त्यातली भाषा राजनैतिक पातळीवर अधिमान्यता असणारीच होती.

त्याचबरोबर चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केलेल्या ताज्या ट्विटमध्ये मानसरोवर यात्रेचा देखील उल्लेख केला. भारत आणि चीन यांच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या बद्दल आनंद व्यक्त करून मानसरोवर यात्रा दोन्ही देशांमध्ये “पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट” साठी उपयुक्त असल्याचे वर्णन केले. भारत आणि चीन यांच्यातले संबंध तिबेटियन बौद्ध आणि हिंदू संस्कृतीमध्ये अतूट संबंध असल्याचे चिनी प्रवक्त्याने आवर्जून त्या ट्विट मध्ये लिहिले.

पण या राजनैतिक गोडी गुलाबीच्या भाषेच्या मागे मात्र चिनी ड्रॅगनचा नेहमीचाच घातक डाव दडलाय. तो जागतिक राजकारणावरच्या पटावर अमेरिका आणि चीन यांच्यातल्या टेरिफ युद्धामधला एक महत्त्वाचा घटक ठरला. ट्रम्प प्रशासनाने चीन विरुद्ध टेरिफ युद्ध छेडल्या नंतर चीनला भारताच्या मदतीची आशा आणि अपेक्षा वाटायला लागली. चीनची भाषा एकदम हिंदी चिनी भाई भाई अशा 1954 च्या पंचशील करारापर्यंत जाऊन पोहोचली, पण त्यानंतर 1962 मध्ये चीनने विश्वासघात केला होता, हे मात्र चिनी राज्यकर्ते ठरवून विसरले.

पण भारतातल्या सरकारने चीनचा हा डाव ओळखला आणि अमेरिका – चीन टेरिफ युद्धात “पार्टी” व्हायचे नाकारून अमेरिकेशी स्वतंत्र व्यापार वाटाघाटी करायला सुरुवात केली. नेमका हाच मुद्दा चीनला खटकला. त्यानंतरच पहलगामचा हल्ला झाला. पण यातून चिनी गेम प्लॅन मात्र उघड्यावर आला.

– चिनी गेम प्लॅन

तसेही चीन भारताला आपल्या “बरोबरचा सवंगडी” समजत नव्हताच, उलट भारत आपल्यापेक्षा दोन पायऱ्या खाली आहे, हे चीनने वारंवार राजनैतिक आणि लष्करी पातळीवर दाखवायचा प्रयत्न केला. त्या पलीकडे जाऊन भारताने जेव्हा अमेरिका – चीन टेरिफ युद्ध मध्ये चीनची बाजू उचलून धरायचे टाळले, त्यावेळी चीनला भारताला त्याची “जागा” दाखवून देण्याची गरज वाटू लागली म्हणूनच चीनने पाकिस्तानला पहलगाम सारखा हल्ला घडवून आणण्यासाठी चिथावणी दिल्याचे मानले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान आपापसांत भिडतील. दोघेही एकमेकांचे नुकसान करतील. मुख्य म्हणजे मोदी सरकारच्या राजवटीत भारताच्या उंचावलेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय प्रतिमेला धक्का बसून ती खाली येईल, असा चीनचा होरा राहिला.

त्यासाठीच चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांची भेट घेऊन पाकिस्तानच्या सुरामध्ये सूर मिसळला. पहलगाम हल्ल्याची “निःपक्ष चौकशी” करायची पाकिस्तानची मागणी चीनने उचलून धरली. पण नंतर मात्र मानसरोवर यात्रा तिबेटियन बौद्ध आणि हिंदू यांच्या संस्कृतीची एकता वगैरे फाका मारणारी ट्विट केली. प्रत्यक्षात चीनची राजनैतिक कृती मात्र भारताच्या विरोधात पाकिस्तानला चिथावणी देणारीच राहिली.

China instigate Pahalgam attack

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात