विशेष प्रतिनिधी
हाँगकाँग : हाँगकाँग मुक्त करा, आमच्या काळाची क्रांती हीच. भ्रष्ट पोलिसांनो, तुमचे सारे कुटुंब नरकात जाईल अशा लोकप्रिय घोषणा देणारे नामवंत निवेदक ताम ताक-ची यांच्यावर चीनने देशद्रोहाचा खटला भरला आहे. China govt fils sedation case against radio anquer
ताम ताक-ची असे त्यांचे नाव असून ते ४८ वर्षांचे आहेत. १९९७ मध्ये ब्रिटनने हाँगकाँगचे हस्तांतरण केल्यानंतर असा खटला दाखल करून सुनावणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ताम हे फास्ट बीट या टोपणनावाने लोकप्रिय आहेत. नभोवाणी निवेदकाशिवाय अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते ओळखले जातात. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलैदरम्यान त्यांनी दिलेल्या किंवा लिहिलेल्या आठ घोषणा म्हणजे देशद्रोह ठरविण्यात आल्या.
वसाहतवाद संपुष्टात आल्यानंतर काही दशके हा कायदा वापरला जात नव्हता. गेल्या वर्षभरात मात्र फुटीरतावादी, देशद्रोहाची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे. मतभेद हे गुन्हेगारी स्वरूपाचे ठरावेत हाच यामागील उद्देश आहे. याशिवाय गेल्या वर्षी नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App