मुख्यमंत्री शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदारांसह रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येस जाणार

ट्वीटद्वारे दिली माहिती, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतच अयोध्येला जाणार नसून, संपूर्ण मंत्रीमंडळासह महायुतीचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींनाही नेणार आहेत. त्यांनी याबाबत ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.Chief Minister Shinde will go to Ayodhya with the entire cabinet, MPs, MLAs to have a darshan of Ram Lalla

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची सर्वांनाच इच्छा आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केलं आहे. मोदींचे शतशः आभार…’

याचबरोबर ‘अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.’ असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

तर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्यावतीने सर्वच शासकीय कार्यलायांना अर्धा दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही राज्यात 22 जानेवारीला सुटीच जाहीर केली आहे. सरकारने याबाबतचा अध्यादेश जाहीर केला आहे.

Chief Minister Shinde will go to Ayodhya with the entire cabinet, MPs, MLAs to have a darshan of Ram Lalla

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात