पंतप्रधान मोदींच्या आसाम दौऱ्यानंतर अवमानाचा खटला दाखल करणार असल्याचे सरमा म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : मुख्यमंत्री हिमंता सरमा हे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहेत. त्यांनी अदानीसोबत आपले नाव जोडणे हे अवमानाचे कृत्य असल्याचे म्हटले आणि पंतप्रधान मोदींचा दौरा झाल्यानंतर आपण आसाम न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. Chief Minister Himanta Sarma will file a defamation case against Rahul Gandhi
१४ एप्रिलनंतर राहुल गांधींविरोधात खटला दाखल करणार असल्याचा इशारा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिला आहे. ते म्हणाले, ‘’राहुल यांनी जे काही ट्विट केले आहे ते अपमानास्पद ट्विट आहे. पंतप्रधान मोदी आसामहून परतल्यानंतर १४ एप्रिलनंतर राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला जाईल.’’
#WATCH | Whatever Rahul Gandhi has tweeted is a defamatory tweet, once PM Modi goes back from Assam there will be a defamatory case filed against him after April 14th… I am still waiting for the invitation from Arvind Kejriwal: Assam CM Himanta Biswa Sarma pic.twitter.com/g5UFSpdAsr — ANI (@ANI) April 9, 2023
#WATCH | Whatever Rahul Gandhi has tweeted is a defamatory tweet, once PM Modi goes back from Assam there will be a defamatory case filed against him after April 14th… I am still waiting for the invitation from Arvind Kejriwal: Assam CM Himanta Biswa Sarma pic.twitter.com/g5UFSpdAsr
— ANI (@ANI) April 9, 2023
केजरीवालांच्या निमंत्रणाची वाट पाहतोय –
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाबद्दल ते म्हणाले, “मी अजूनही अरविंद केजरीवाल यांच्या निमंत्रणाची वाट पाहत आहे.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, केजरीवाल यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना दिल्लीत येण्यास सांगितले होते.
सरमा कोणत्या ट्विटमुळे दुखावले गेले?
अदानी प्रकरणामध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे नाव जोडण्यासाठी राहुल गांधी यांनी ADANI नावाचे प्रत्येक अक्षर वापरले. यामध्ये काँग्रेसच्या अशा पाच नेत्यांची नावे लिहिली होती, ज्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App